चिचोंडी पाटील : शिक्षण विभागातील कर्मचार्यांना जाग
चिचोंडी पाटील(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकसहभागातून बसविलेल्या ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा, खेळणीच्या चौकशी बाबत आपले सरकार पोर्टलवर तक्रार नोंदविताच शिक्षण विभागातील कर्मचार्यांना जाग आली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना पंचायत समितीच्या गटशिक्षणधिकार्यांना दिली आहे. चिचोंडी पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे. तसेच, विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेसाठी शालेय … The post चिचोंडी पाटील : शिक्षण विभागातील कर्मचार्यांना जाग appeared first on पुढारी.


चिचोंडी पाटील(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकसहभागातून बसविलेल्या ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा, खेळणीच्या चौकशी बाबत आपले सरकार पोर्टलवर तक्रार नोंदविताच शिक्षण विभागातील कर्मचार्यांना जाग आली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना पंचायत समितीच्या गटशिक्षणधिकार्यांना दिली आहे.
चिचोंडी पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे.
तसेच, विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेसाठी शालेय व्यवस्थापन समितीने लोकसहभागातून साधारण आठ ते दहा लाख रुपये किंमतीच्या वस्तू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दिले होते. आता यातील अनेक वस्तू गायब आहेत. शाळेतील या वस्तूंची नोंद आणि पंचायत समितित असलेली वस्तूंची नोंद एकमेकांशी जुळत नसल्याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. शाळेची ओळख डिजिटल मॉडेल म्हणून आहे.
परंतु, सध्या या शाळेतील बर्याच वस्तू नसल्याचे आढळून आले. लोकसभागातील वस्तूंचा ताळमेळ बसत नसल्याने पूर्वी दिलेल्या वस्तू अजून ठीक नाहीत आणि आता लोकसहभाग द्यायचा कसा, हाच यक्ष प्रश्न लोकांसमोर उभा आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी वारंवार केली होती. परंतु, त्यावर कारवाई होत नव्हती. शेवटी याबाबत आपले सरकार पोर्टलवर तक्रार नोंदविण्यात आली. त्याची दखल घेत शिक्षण विभागाकडून पंचायत समिती गटशिक्षणाधिकार्यांना तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करुन अहवाल विनाविलंब सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
विस्तार अधिकार्यांचा अहवाल अमान्य
विस्तार अधिकार्यांनी याबाबत सविस्तर माहिती घेतली असून, या साहित्याचा व विद्यामान मुख्याध्यापक व शाळेय व्यवस्थापन कमिटीचा या प्रकरणाशी कसलाही संबंध नसून, सध्या त्यांच्या ताब्यात असलेल्या वस्तूंशी त्यांचा संबंध आहे, असा अहवाल दिला आहे. परंतु, विस्तार अधिकार्यांनी दिलेला अहवाल सध्याच्या शालेय कमिटीला अमान्य असल्याचा ठराव त्यांनी केला आहे.
हेही वाचा
अहमदनगर : झेडपीच्या 80 शाळांना डिजिटल संसाधने
पाथर्डी तालुका : घरगुती ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले
Nepal: ५ परदेशी नागरिकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर बेपत्ता
The post चिचोंडी पाटील : शिक्षण विभागातील कर्मचार्यांना जाग appeared first on पुढारी.
What's Your Reaction?






