जावयाचा अजब गजब पाहुणचार! आधी सारं गाव बसवतं गाढवावर; नंतर होतो सन्मान, काय आहे प्रथा?
बीड जिल्ह्यातील विडा येथे दर वर्षी धुळवडीच्या दिवशी जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा आहे. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या रंगोत्सवात जावयाची थट्टामस्करी करण्यासाठी ही परंपरा निर्माण झाली आहे. धिंड काढून झाल्यावर थट्टा मस्करी केल्याबद्दल सन्मान केला जातो.८५ वर्षांची परंपरा...गावला जोडणारा हा सण म्हणूनच भारतीय संस्कृतीचे वेगळा रंग दाखवणारा आहे. यंदाचा हा गदर्भ स्वारीचा मान विड्याचे जावई अविनाश करपे यांना मिळाला . बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा येथे ही परंपरा आहे. गावाच्या बारा वाड्या आणि तेरावा विडा अशी गावाची ओळख आहे. दर वर्षी धुळवडीच्या दिवशी जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा गेली ८५ वर्षे आहे. गावचे जहागीरदार आनंद ठाकूर देशमुख यांचे जावई धुळवडीच्या दिवशी सासुरवाडीला गेले. त्या वेळी आनंद ठाकूर देशमुखांनी जावयाची थट्टा करण्यासाठी त्याची गाढवावरून धिंड काढली आणि नंतर त्याचा मानपान केला. त्यानंतर ही प्रथा गावकऱ्यांनी कायम ठेवली.दर वर्षी धुळवडीच्या आधी आठ दिवस गावात जावई शोध सुरू होतो. यंदाचा मान जवळबन तालुका येथील अविनाश करपे यांना मिळाला. त्यानंतर परंपरेनुसार डॉल्बीच्या दणदणाटात वरात काढण्यात आली. दुपारी एकच्या सुमारास शेवटी मारुतीच्या पारावर जावयाला मानपानाचे कपडे आणि आहेर देऊन सत्कार केला.

बीड जिल्ह्यातील विडा येथे दर वर्षी धुळवडीच्या दिवशी जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा आहे. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या रंगोत्सवात जावयाची थट्टामस्करी करण्यासाठी ही परंपरा निर्माण झाली आहे. धिंड काढून झाल्यावर थट्टा मस्करी केल्याबद्दल सन्मान केला जातो.
८५ वर्षांची परंपरा...
गावला जोडणारा हा सण म्हणूनच भारतीय संस्कृतीचे वेगळा रंग दाखवणारा आहे. यंदाचा हा गदर्भ स्वारीचा मान विड्याचे जावई अविनाश करपे यांना मिळाला . बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा येथे ही परंपरा आहे. गावाच्या बारा वाड्या आणि तेरावा विडा अशी गावाची ओळख आहे. दर वर्षी धुळवडीच्या दिवशी जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा गेली ८५ वर्षे आहे. गावचे जहागीरदार आनंद ठाकूर देशमुख यांचे जावई धुळवडीच्या दिवशी सासुरवाडीला गेले. त्या वेळी आनंद ठाकूर देशमुखांनी जावयाची थट्टा करण्यासाठी त्याची गाढवावरून धिंड काढली आणि नंतर त्याचा मानपान केला. त्यानंतर ही प्रथा गावकऱ्यांनी कायम ठेवली.
दर वर्षी धुळवडीच्या आधी आठ दिवस गावात जावई शोध सुरू होतो. यंदाचा मान जवळबन तालुका येथील अविनाश करपे यांना मिळाला. त्यानंतर परंपरेनुसार डॉल्बीच्या दणदणाटात वरात काढण्यात आली. दुपारी एकच्या सुमारास शेवटी मारुतीच्या पारावर जावयाला मानपानाचे कपडे आणि आहेर देऊन सत्कार केला.
What's Your Reaction?






