डॉ. विखे उत्कृष्ट खासदार ; लोकसभेच्या 10 सर्वोत्तम नवोदित सदस्यांमध्ये नोंद

नगर : पुढारी वृत्तसेवा :  अहमदनगर मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जनहिताचे प्रश्न उपस्थित करीत लोकसभेत अभिमानास्पद कामगिरी केली. त्यामुळे लोकसभेतील 10 सर्वोत्तम नवोदित सदस्यांमध्ये त्यांची नोंद झाली आहे. लोकसभा सचिवालयाच्या आकडेवारीनुसार 250 नवोदित खासदारांमध्ये त्यांची संसदेतील कामगिरी सरस ठरल्याने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही त्यांचे विशेष कौतुक केले. सतराव्या लोकसभेत 270 … The post डॉ. विखे उत्कृष्ट खासदार ; लोकसभेच्या 10 सर्वोत्तम नवोदित सदस्यांमध्ये नोंद appeared first on पुढारी.

डॉ. विखे उत्कृष्ट खासदार ; लोकसभेच्या 10 सर्वोत्तम नवोदित सदस्यांमध्ये नोंद

नगर : पुढारी वृत्तसेवा :  अहमदनगर मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जनहिताचे प्रश्न उपस्थित करीत लोकसभेत अभिमानास्पद कामगिरी केली. त्यामुळे लोकसभेतील 10 सर्वोत्तम नवोदित सदस्यांमध्ये त्यांची नोंद झाली आहे. लोकसभा सचिवालयाच्या आकडेवारीनुसार 250 नवोदित खासदारांमध्ये त्यांची संसदेतील कामगिरी सरस ठरल्याने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही त्यांचे विशेष कौतुक केले. सतराव्या लोकसभेत 270 खासदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. त्यापैकी मंत्री न झालेल्या 250 नवोदित सदस्यांची माहिती संकलित करण्यात आली.

त्यांनी जनहिताचे 41 हजार 104 प्रश्न संसदेत उपस्थित केल्याचे आकडेवारीत स्पष्ट होते. या सदस्यांपैकी खासदार डॉ. विखे पाटील यांनी 426 तारांकित प्रश्नोत्तरांच्या चर्चेत सहभागी होत लक्ष वेधले आहे. जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, चर्चासत्रे आणि लोकसभेचे बिल अशा एकूण 531 वेळा त्यांच्या सहभागाची नोंद करण्यात आली आहे. या लोकसभेच्या 11 सत्रांमध्ये, सात खासगी विधेयकांच्या चर्चेत विखे यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध जनहिताच्या मुद्द्यांवर हस्तक्षेप करत आपली भूमिका ठामपणे मांडली.

 

लोकसभेतील विविध चर्चांमध्ये आम्ही घेतलेल्या सहभागाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. आम्ही मांडलेले मुद्दे आणि हरकती यादेखील त्यांनी पटलावर घेऊन त्यानुसार सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. आमच्यासारख्या खासदारांसाठी नक्कीच कौतुकाची थाप मिळाल्यासारखे आहे.
                                                                        – खा. डॉ. सुजय विखे पाटील

 

हे ही वाचा :

पवार कुटुंबीय धमकी देण्याचे प्रकार करत नाहीत : छगन भुजबळ

आघाडी सरकारचे नेतृत्वच मोठा कलंक होता : पालकमंत्री राधाकृष्ण विखे

The post डॉ. विखे उत्कृष्ट खासदार ; लोकसभेच्या 10 सर्वोत्तम नवोदित सदस्यांमध्ये नोंद appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow