तुम्ही आईच्या पोटात होते तेव्हा मी मंत्री; छगन भुजबळ यांचा रोहित पवारांवर निशाणा

राजगुरुनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : ‘तुम्ही आईच्या पोटात चार महिन्यांचे होते, तेव्हा मी राज्याचा आमदार आणि मंत्री होतो. तुमच्यासारखे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आम्ही जन्माला आलो नाही. आम्हाला काय मिळाले, यावर बोलताना आपल्या वयाचा, कर्तृत्वाचा विचार करा,’ असा सणसणीत टोला राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार … The post तुम्ही आईच्या पोटात होते तेव्हा मी मंत्री; छगन भुजबळ यांचा रोहित पवारांवर निशाणा appeared first on पुढारी.

तुम्ही आईच्या पोटात होते तेव्हा मी मंत्री; छगन भुजबळ यांचा रोहित पवारांवर निशाणा

राजगुरुनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : ‘तुम्ही आईच्या पोटात चार महिन्यांचे होते, तेव्हा मी राज्याचा आमदार आणि मंत्री होतो. तुमच्यासारखे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आम्ही जन्माला आलो नाही. आम्हाला काय मिळाले, यावर बोलताना आपल्या वयाचा, कर्तृत्वाचा विचार करा,’ असा सणसणीत टोला राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना राजगुरुनगर येथे लगावला.

राज्याच्या राजकारणातील सध्याच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळांच्या पदांची संख्या, यादी प्रसिद्ध करीत आमदार रोहित पवार यांनी साहेबांनी (शरद पवार यांनी) आणखी काय द्यायला हवे? असे टि्वट केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना छगन भुजबळ यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. नाशिकवरून पुण्याच्या दिशेने जात असताना सोमवारी (दि. 10) दुपारी राजगुरुनगर येथे थांबून छगन भुजबळ यांनी हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या वेळी पत्रकारांच्या प्रश्नांना प्रतिसाद देताना ते बोलत होते.

कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ म्हणाले, की रोहित पवार आईच्या पोटात चार महिन्यांचे असताना मी आमदार होतो, मंत्री होतो. ते सहा महिन्यांचे असतील तेव्हा विरोधी पक्षनेता होतो. 15 वर्षांचे असतील तेव्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ पदावर होतो. त्यांना राजकारणाची जाण किती? हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले. मागे बड्यांचे आशीर्वाद आहेत, माझे तसे नाही, असे त्यांनी सुनावले.
मशिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आमच्या शपथविधीला पहिल्या रांगेत बसले, का परतले? महिती नाही. त्यांना शिरूरच्या पाच आमदारांनी निवडून पाठवले. पुढे काय होईल, हे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील हेच सांगू शकतील,फ असा टोला त्यांनी कोल्हे यांना लगावला.

जुन्नरचे आमदार अतुल बेनके काही म्हणत असले, तरी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पुढच्या निवडणुकीत ते असतील, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले. खेड बाजार समितीचे माजी सभापती विनायक घुमटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलासराव सांडभोर, गणेश घुमटकर, जी. रं. शिंदे, दीपक घुमटकर, कैलास केदारी, अशोक कडलग, अमित घुमटकर, धीरज घुमटकर, संतोष डोळस आदी मान्यवर व नागरिक या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा

भारतीय वंशाची व्यक्ती बनणार सिंगापूरची राष्ट्राध्यक्ष?

लोणी : आठ तासांच्या जनता दरबारात सुटले प्रश्न!

कोळपेवाडी : जवान आहेरांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

The post तुम्ही आईच्या पोटात होते तेव्हा मी मंत्री; छगन भुजबळ यांचा रोहित पवारांवर निशाणा appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow