नगर : साबन नाला, कापरी ओढा रुंदीकरण-खोलीकरण

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कापरी नाला व साबन ओढ्याच्या रुंदीकरण व खोलीकरण कामासाठी लागणार्‍या यांत्रिकी इंधन खर्चास मंजुरी मिळाली आहे. यासाठी आमदार शंकरराव गडाख यांच्या केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यातील जैनपूर, घोगरगाव, सुरेगांव (गंगा) तसेच बेलपांढरी परिसरातून वाहणारा नैसर्गिक प्रवाहाचा कापरी नाला व साबन ओढा पाऊस तसेच भंडारदरा धरणाच्या … The post नगर : साबन नाला, कापरी ओढा रुंदीकरण-खोलीकरण appeared first on पुढारी.

नगर : साबन नाला, कापरी ओढा रुंदीकरण-खोलीकरण

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कापरी नाला व साबन ओढ्याच्या रुंदीकरण व खोलीकरण कामासाठी लागणार्‍या यांत्रिकी इंधन खर्चास मंजुरी मिळाली आहे. यासाठी आमदार शंकरराव गडाख यांच्या केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यातील जैनपूर, घोगरगाव, सुरेगांव (गंगा) तसेच बेलपांढरी परिसरातून वाहणारा नैसर्गिक प्रवाहाचा कापरी नाला व साबन ओढा पाऊस तसेच भंडारदरा धरणाच्या पाण्यातून मोठ्या प्रमाणावर दगड, माती वाहून येत असल्यामुळे उथळ बनला आहे. त्यामुळे आसपासच्या बागायती शेतजमिनी पाण्याखाली जाऊन क्षारपड तसेच नापिक बनल्या. या संकटामुळे शेतकर्‍यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला. तसेच, त्यांच्याकडे असलेल्या राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकांच्या कर्जासह इतर वित्तीय संस्थांची कर्ज परतफेड करण्याचा मार्गही खुंटल्याने त्यांना मानसिक तणावात जगण्याची वेळ आली होती.

मंत्री असताना गडाख यांनी या परिसरास भेट देऊन पाहणी करत वस्तुस्थिती समजून घेतली. मुंबई येथे मंत्रालयात बैठक घेऊन संबंधितांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानंतर मृद व जलसंधारण, तसेच जलनिस्सारण विभागाच्या पथकाने या परिसराची पाहणी केली. त्यांच्या अहवालानुसार सुमारे 150 ते 200 हेक्टर क्षेत्र पूर्णतः, तर 200 हेक्टर क्षेत्र अंशतः पाणथळ बनले असून, सुमारे 100 ते 130 हेक्टर क्षेत्र क्षारयुक्त बनल्याचे निश्चित करण्यात आले. संबंधित गावांतील बहुतांश भाग हा जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी उपयोगात आणलेला असून प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीही यामुळे बाधित झाल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

जैनपूर, घोगरगाव आणि बेलपांढरी गावांच्या सीमा गोदावरी नदीलगत असून, सदरचे नदीपात्र जायकवाडी धरणाच्या फुगवटा लांबीत येण्यासह भंडारदरा धरणाच्या ओव्हरफ्लोचे पाणीही टेलटँकद्वारे याच माध्यमातून सोडण्यात येत असल्यामुळे बहुतांश काळ्या मातीचा भाग असलेल्या या परिसरात जमिनीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी चर योजना राबविण्याची उपाययोजना सुचविण्यात आली. कापरी ओढ्यालगतच्या जमिनीतून पाण्याचा निचरा होण्यासह ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत होण्यासाठी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाचे 2 कोटी 37 लाख रुपयांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून नगर येथील मृद व जलसंधारण विभागाने दि.24 डिसेंबर 2021 रोजी जिल्हा नियोजन समितीकडे सादर केले होते.

सदरचे काम अहमदनगर कृषी विभागामार्फत करण्याबाबत जिल्हा कृषी अधीक्षकांना दि.31 जानेवारी 2022 रोजी पत्र देण्यात आले होते. त्यानंतर आमदार गडाख यांच्या सूचनेनुसार सदरचे रुंदीकरण व खोलीकरण जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाकडून करून घेण्याचा धोरणात्मक शासन निर्णय घेण्यात आला आहे.

लवकरच काम सुरू होणार
या कामाच्या यांत्रिकीकरणासाठी लागणार्‍या इंधनाच्या 1 कोटी 50 लाख रूपये खर्चास जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 च्या नाविन्यपूर्ण योजनेतून मंजुरी मिळाली आहे. यांत्रिकी विभागाची तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर लवकरच जिल्हाधिकारी यांची प्रशासकीय मान्यता मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर लगेचच या कामास सुरुवात होणार आहे.

The post नगर : साबन नाला, कापरी ओढा रुंदीकरण-खोलीकरण appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow