नोकरीच्या वेळा आणि आरोग्य

आज आरोग्याकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही इतका माणूस व्यस्त बनला आहे. रात्री उशिरापर्यंत काम करणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. अशा व्यक्तींनी आपल्या जीवनशैलीत काही नियम पाळणे गरजेचे असते. आपल्या झोपण्याच्या आणि जागे असण्याच्या वेळांवर शरीरातील चयापचय क्रिया अवलंबून असते. तसेच यावर मानसिक संतुलन आधारित असते. कोणत्याही व्यक्तीची झोप नियमित असेल, तर या दोन्ही क्रिया संतुलित राहतात; … The post नोकरीच्या वेळा आणि आरोग्य appeared first on पुढारी.

नोकरीच्या वेळा आणि आरोग्य

डॉ. मनोज शिंगाडे

आज आरोग्याकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही इतका माणूस व्यस्त बनला आहे. रात्री उशिरापर्यंत काम करणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. अशा व्यक्तींनी आपल्या जीवनशैलीत काही नियम पाळणे गरजेचे असते. आपल्या झोपण्याच्या आणि जागे असण्याच्या वेळांवर शरीरातील चयापचय क्रिया अवलंबून असते. तसेच यावर मानसिक संतुलन आधारित असते. कोणत्याही व्यक्तीची झोप नियमित असेल, तर या दोन्ही क्रिया संतुलित राहतात; मात्र झोपण्याच्या वेळा सतत बदलत असल्यास यांचा समतोल बिघडतो आणि व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडते. यामुळे व्यक्तीच्या कामातील अचूकता, सफाईदारपणा आणि कार्यक्षमतेवर परिणाम होतो. अपूर्ण झोपेमुळे मनाचे संतुलनही बिघडते.

झोपेबरोबरच जेवणाच्या वेळादेखील व्यवस्थित पाळता येत नाहीत. त्यामुळे हायपर अ‍ॅसिडिटी, पोटदुखी, आल्सर, अपचन यासारखे पोटाचे विकार निर्माण होतात. झोपेचे घड्याळ बिघडल्यामुळे सतत थकवा येणे, चिंता, नैराश्य यांसारखे मनोविकारही उद्भवतात आणि उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्थूलपणा असे आजारही होतात. शिफ्ट रात्रीची असो अथवा दिवसाची, घरी आल्यानंतर काही काळ विश्रांती आवश्यक घ्यावी.

मनाला आनंद वाटेल अशा प्रकारचे संगीत ऐकावे. कोमट पाण्याने आंघोळ करावी किंवा शॉवर घ्यावा. यामुळे मन रिलॅक्स होईल आणि मनावरचा ताण दूर होईल. शिफ्ट ड्युटीच्या काळात खाण्याच्या वेळा मात्र त्याच ठेवाव्यात आणि त्यांचे काटेकोर पालन करावे. यामुळे पचनाचे आजार होण्याची शक्यता बर्‍याच प्रमाणात कमी होते. शिफ्ट सुरू असताना आहारात पालेभाज्या, फळे, डाळी, कडधान्य यांचा वापर अधिक प्रमाणात करावा. गोड, चरबीयुक्त, मसालेदार, तळलेले अधिक तिखट पदार्थ टाळावेत.

काम करताना मध्ये ब्रेक घेतला जातो. यावेळी चहा, कॉफी, बाटलीबंद शीतपेय घेऊ नये. त्याऐवजी फळांचा रस घ्यावा आणि यावेळी थोडेसे चालत जाऊन पाय मोकळे करून घ्यावे. काम संपल्यानंतर भूक नाही असे कारण सांगून उपाशीपोटी झोपू नये. त्याऐवजी ग्लासभर दूध किंवा लस्सी प्यावी. झोपताना खोलीचे तापमान आल्हाददायक असेल याकडे लक्ष द्याल.

हेही वाचा : 

The post नोकरीच्या वेळा आणि आरोग्य appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow