पिंपरी : औद्योगिक वायुगळती रोखण्यासाठी पालिकेचे मॉक ड्रील

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, औद्योगिक सुरक्षा महामंडळ व टाटा मोटर्स कंपनी यांच्या वतीने औद्योगिक वायुगळती रोखण्याच्या दृष्टीने संयुक्तपणे चिंचवड येथील टाटा मोटर्स कंपनीत मॉक ड्रील घेण्यात आले. या वेळी महापालिकेचे सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, अग्निशमन अधिकारी उदय वानखेडे, औद्योगिक सुरक्षा महामंडळ सहसंचालक संजय गिरी, टाटा मोटर्सचे … The post पिंपरी : औद्योगिक वायुगळती रोखण्यासाठी पालिकेचे मॉक ड्रील appeared first on पुढारी.

पिंपरी : औद्योगिक वायुगळती रोखण्यासाठी पालिकेचे मॉक ड्रील

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, औद्योगिक सुरक्षा महामंडळ व टाटा मोटर्स कंपनी यांच्या वतीने औद्योगिक वायुगळती रोखण्याच्या दृष्टीने संयुक्तपणे चिंचवड येथील टाटा मोटर्स कंपनीत मॉक ड्रील घेण्यात आले. या वेळी महापालिकेचे सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, अग्निशमन अधिकारी उदय वानखेडे, औद्योगिक सुरक्षा महामंडळ सहसंचालक संजय गिरी, टाटा मोटर्सचे सुरक्षा अधिकारी राकेश पांडे, व्यवस्थापक प्रशांत जोशी, आपत्ती नियंत्रक शशिन पाटील, कामगार संघटनेचे प्रतिनिधी संतोष संकपाळ, अबीद सय्यद व कामगार उपस्थित होते.

सहआयुक्त इंदलकर म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीमध्ये संकटावर कशा प्रकारे मात करता येईल हा या मॉक ड्रीलचा उद्देश होता. अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर किती कालावधीमध्ये अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचू शकते. इतर यंत्रणा किती कालावधीमध्ये प्रतिसाद देऊ शकतात, हे समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दर तीन महिन्याला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. यामध्ये बाकीच्या कंपन्यांचाही समावेश असणार आहे. यामध्ये स्वयंसेवकांचेही सहकार्य लाभणार आहे. सामान्य नागरिकांना अग्निशमन विभागाकडून आपातकालीन संकटांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ओमप्रकाश बहिवाल म्हणाले, या पुढेही महापालिका अशा कार्यक्रमांच्या मॉक ड्रीलचे आयोजन करणार आहे. शहरातील कंपन्यांमध्ये जागरूकता निर्माण केली जाणार आहे. संकटकाळी परिस्थिती कशी हाताळावी, याची त्यांनी माहिती दिली.

हेही वाचा : 

नाशिक : आधी मतदारांना नमस्कार नंतर डीपीडिसी : छगन भुजबळ

धक्कादायक ! थेट वर्गात घुसून विद्यार्थिनीची छेड

The post पिंपरी : औद्योगिक वायुगळती रोखण्यासाठी पालिकेचे मॉक ड्रील appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow