पिंपरी : पीएमपीचे बूम बॅरिअर हरवले कुठे ?

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी शहरात बीआरटी मार्ग तयार केले आहेत. या मार्गातून फक्त पीएमपीच्या बसेसना जाण्यास परवानगी असतानाही, अन्य चारचाकी, दुचाकी वाहने यातून सर्रास घुसखोरी करताना दिसतात. अशा वाहनांना रोखण्यासाठी पीएमपीकडून बुम बॅरिअर बसविले होते; मात्र हे बुम बॅरिअर सध्यातरी बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे हे बुम बॅरिअर फक्त नावासाठीच … The post पिंपरी : पीएमपीचे बूम बॅरिअर हरवले कुठे ? appeared first on पुढारी.

पिंपरी : पीएमपीचे बूम बॅरिअर हरवले कुठे ?

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी शहरात बीआरटी मार्ग तयार केले आहेत. या मार्गातून फक्त पीएमपीच्या बसेसना जाण्यास परवानगी असतानाही, अन्य चारचाकी, दुचाकी वाहने यातून सर्रास घुसखोरी करताना दिसतात. अशा वाहनांना रोखण्यासाठी पीएमपीकडून बुम बॅरिअर बसविले होते; मात्र हे बुम बॅरिअर सध्यातरी बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे हे बुम बॅरिअर फक्त नावासाठीच आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो.

बीआरटी मार्गातून अन्य वाहनांनी प्रवेश करु नये यासाठी बूम बसविण्यात आले आहेत. बूम बॅरिअर बसविण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. तरीदेखील बूम बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे बीआरटी मार्गातून खाजगी वाहने निर्धास्तपणे नेली जातात. या घुसखोरीकडे पीएमपी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

चिंचवड परिसरात तसेच काळेवाडी परिसरातील बीआरटी मार्गात बूम बसविण्यात आले होते. बूम बॅरिअर बसविल्यानंतर खाजगी वाहन्यांच्या घुसखोरीचे प्रमाण घटले होते. बीआरटी मार्गात प्रायोगिक तत्त्वावर हे बूम बसविण्यात आले होते; मात्र रात्रीच्या वेळी खासगी वाहनांची होणारी घुसखोरीमुळे बूम बॅरिअरची दुरवस्था झाली आहे.

– अनंत वाघमारे
बीआरटी व्यवस्थापक

हेही वाचा

पिंपरी : संडे नाईट गुन्हेगार ऑल आऊट; पाचशेहून अधिक पोलिस रस्त्यावर

छगन भुजबळांपाठोपाठ धनंजय मुंडेंनाही धमकीचा फोन

नाशिक : देवळालीत बिबट्याचा धुमाकूळ, मध्यरात्री होतोय पाळीव प्राण्यांवर हल्ला

The post पिंपरी : पीएमपीचे बूम बॅरिअर हरवले कुठे ? appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow