पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात भरते ‘जत्रा’ ; अपुऱ्या बैठक व्यवस्थेमुळे नागरिकांचे हाल
पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात महसुली दाव्यांची सुनावणी सुरू असते. परंतु सुनावण्यांची संख्या अधिक ठेवल्याने पाचव्या मजल्यावर नागरिकांना बसण्यासाठी असलेली सुविधा अपुरी आहे. त्यामुळे नागरिकांना तासन्तास उभे राहावे लागत आहे, तर ज्येष्ठ नागरिक महिलांना फरशीवर बसावे लागत आहे. सोमवारी अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात नोटीस बजावणीची 63 … The post पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात भरते ‘जत्रा’ ; अपुऱ्या बैठक व्यवस्थेमुळे नागरिकांचे हाल appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात महसुली दाव्यांची सुनावणी सुरू असते. परंतु सुनावण्यांची संख्या अधिक ठेवल्याने पाचव्या मजल्यावर नागरिकांना बसण्यासाठी असलेली सुविधा अपुरी आहे. त्यामुळे नागरिकांना तासन्तास उभे राहावे लागत आहे, तर ज्येष्ठ नागरिक महिलांना फरशीवर बसावे लागत आहे.
सोमवारी अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात नोटीस बजावणीची 63 प्रकरणे, तर सुनावणीचे 159 प्रकरणांची सुनावणी ठेवण्यात आली होती. एका सुनावणीसाठी किमान चार ते पाच व्यक्ती हजर असतात. सुनावणीमध्ये दावा आणि प्रति दावा करणार्यांना हजर राहण्याची नोटीस बजावली जाते. सुनावणीमध्ये दोन्ही बाजूचे वकील आपले म्हणणे मांडत असतात. त्यांना किमान 4 ते 5 मिनिटे लागू शकतात. असे असताना 159 सुनावण्यांमध्ये आपले म्हणणे मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दीडशेपेक्षा अधिक प्रकरणांची सुनावणी
पाचव्या मजल्यावर केवळ 15 ते 20 नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था आहे. मात्र, एकाचवेळी त्यापेक्षा अधिक नागरिक आल्यास त्यांना उभे राहावे लागते. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठी अडचण निर्माण होत आहे. विशेष म्हणजे एका दिवसासाठी 60 ते 70 सुनावण्या यापूर्वी होत होत्या. मात्र, त्याची संख्या दीडशेपेक्षा अधिक केल्याने गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
कोणत्याही क्षणी सुनावणी
दाव्यांच्या सुनावणीसाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून नागरिक येत असतात. त्यांची सुनावणी ही शेवटची असेल तर त्यांना दिवसभर बसून राहावे लागते. आपली सुनावणी कधीही येऊ शकते, या शक्यतेमुळे नागरिक पाचव्या मजल्यावरच थांबून असतात.
The post पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात भरते ‘जत्रा’ ; अपुऱ्या बैठक व्यवस्थेमुळे नागरिकांचे हाल appeared first on पुढारी.
What's Your Reaction?