पुण्यात हॉस्पिटलने माणूसकी सोडली, जुळ्यांना जन्म देऊन आईने जीव सोडला; आमदाराची पोलिसांत धाव, चौकशी सुरू
पुणे : सांस्कृतिक राजधानी आणि सामाजिक जाणीवा असलेल्या पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर या धर्मादाय नोंदणी असलेल्या रुग्णालयातच रुग्णसेवेला तडा गेला असून गर्भवती महिलेवर वेळीच उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गर्भवती महिलेला पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये (Hospital) उपचारासाठी दाखल करतेवेळी अगोदर 10 लाख रुपये भरावे, त्यानंतरच दाखल केले जाईल अशा पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे, संबंधित महिलेला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी, प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. मात्र, दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर दुर्दैवाने महिलेचा मृत्यू झाला. या घटनेवरुन आता सर्वत्र संताप व्यक्त होत असून आमदार अमित गोरखे यांनीही याप्रकरणी पोलिसात धाव घेतली आहे. तर, रुग्णालय प्रशासनाच्यावतीनेही आपली बाजू मांडण्यात आली आहे. पुण्यातील महिलेच्या मृत्यू प्रकरणात दीनानाथ रुग्णालयाकडून रुग्णालयात अंतर्गत चौकशी करण्यात आली आहे. रुग्णालय प्रशासनाकडून वस्तुस्थिती राज्य सरकारला देण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांकडे 10 लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही. परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही. परिणामी गर्भवती महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र महिलेचा जीव गमावला. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे. जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली माहिती दरम्यान, या घटनेसंदर्भात दीनानाथ रुग्णालयाकडून चौकशी केली जाणार असून या संदर्भातील अहवाल आम्ही राज्य सरकारला सादर करणार आहोत. मीडियात सध्या बातम्या येत आहेत, त्या अर्धवट आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे, सध्या मला जास्त बोलता येणार नाही, अशी माहिती दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी दिली. आमदारांची पोलिसात धाव, गुन्हा दाखल करण्याची मागणी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी घेतली पुण्याचे सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन महिला भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गोरखे यांनी घटनेचा सर्व वृतांत सविस्तर पोलीस उपायुक्त रंजन शर्मा यांना सांगितला. त्यानंतर, योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे, आश्वासन शर्मा यांनी आमदार महोदयांना दिले आहे. महिला आयोगानेही घेतली दखल पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केलेला हलगर्जीपणा, योग्य उपचार न दिल्याने 2 जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने आयुक्त, पुणे महानगरपालिका यांना सदर प्रकरणी तथ्य तपासत चौकशी करुन कार्यवाही करण्याचे आणि आयोगास वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवरुन दिली आहे. हेही वाचा ... तर 3 वर्षात महावितरण बंद पडेल; वीज दर कपातीच्या निर्णयावरुन उडाले खटके; विश्वास पाठक यांचा खळबळजनक दावा

पुणे : सांस्कृतिक राजधानी आणि सामाजिक जाणीवा असलेल्या पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर या धर्मादाय नोंदणी असलेल्या रुग्णालयातच रुग्णसेवेला तडा गेला असून गर्भवती महिलेवर वेळीच उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गर्भवती महिलेला पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये (Hospital) उपचारासाठी दाखल करतेवेळी अगोदर 10 लाख रुपये भरावे, त्यानंतरच दाखल केले जाईल अशा पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे, संबंधित महिलेला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी, प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. मात्र, दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर दुर्दैवाने महिलेचा मृत्यू झाला. या घटनेवरुन आता सर्वत्र संताप व्यक्त होत असून आमदार अमित गोरखे यांनीही याप्रकरणी पोलिसात धाव घेतली आहे. तर, रुग्णालय प्रशासनाच्यावतीनेही आपली बाजू मांडण्यात आली आहे. पुण्यातील महिलेच्या मृत्यू प्रकरणात दीनानाथ रुग्णालयाकडून रुग्णालयात अंतर्गत चौकशी करण्यात आली आहे. रुग्णालय प्रशासनाकडून वस्तुस्थिती राज्य सरकारला देण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांकडे 10 लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही. परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही. परिणामी गर्भवती महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र महिलेचा जीव गमावला. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे.
जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली माहिती
दरम्यान, या घटनेसंदर्भात दीनानाथ रुग्णालयाकडून चौकशी केली जाणार असून या संदर्भातील अहवाल आम्ही राज्य सरकारला सादर करणार आहोत. मीडियात सध्या बातम्या येत आहेत, त्या अर्धवट आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे, सध्या मला जास्त बोलता येणार नाही, अशी माहिती दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी दिली.
आमदारांची पोलिसात धाव, गुन्हा दाखल करण्याची मागणी
विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी घेतली पुण्याचे सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन महिला भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गोरखे यांनी घटनेचा सर्व वृतांत सविस्तर पोलीस उपायुक्त रंजन शर्मा यांना सांगितला. त्यानंतर, योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे, आश्वासन शर्मा यांनी आमदार महोदयांना दिले आहे.
महिला आयोगानेही घेतली दखल
पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केलेला हलगर्जीपणा, योग्य उपचार न दिल्याने 2 जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने आयुक्त, पुणे महानगरपालिका यांना सदर प्रकरणी तथ्य तपासत चौकशी करुन कार्यवाही करण्याचे आणि आयोगास वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
हेही वाचा
What's Your Reaction?






