राज्यात शुक्रवारपासून मुसळधारची शक्यता
पुणे : मान्सूनचा ट्रफ उत्तर भारतातून महाराष्ट्रात येण्यास शुक्रवार, 14 जुलैपासून सुरुवात होणार आहे. कोकणासह उर्वरित राज्यात पाऊस वाढेले. त्यामुळे 17 ते 19 जुलैदरम्यान राज्यात सर्वत्र अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हिमालयापासून मध्य प्रदेशपर्यंत मान्सून जोरदार बरसत असून, 350 ते 150 मिलिमीटर इतका पाऊस त्या भागात होत आहे. त्यामुळे त्या भागात पूर आलेला आहे. … The post राज्यात शुक्रवारपासून मुसळधारची शक्यता appeared first on पुढारी.
पुणे : मान्सूनचा ट्रफ उत्तर भारतातून महाराष्ट्रात येण्यास शुक्रवार, 14 जुलैपासून सुरुवात होणार आहे. कोकणासह उर्वरित राज्यात पाऊस वाढेले. त्यामुळे 17 ते 19 जुलैदरम्यान राज्यात सर्वत्र अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हिमालयापासून मध्य प्रदेशपर्यंत मान्सून जोरदार बरसत असून, 350 ते 150 मिलिमीटर इतका पाऊस त्या भागात होत आहे. त्यामुळे त्या भागात पूर आलेला आहे. हा मान्सून ट्रफ उत्तर भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली असून, अजून तीन ते चार दिवस लागतील, असा अंदाज आहे. त्यामुळे 14 ते 17 जुलैदरम्यान कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पाऊस वाढणार आहे. या कालावधीत मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे; तर 17 ते 19 दरम्यान पाऊस अतिवृष्टीकडे जाईल आणि तो 24 जुलैपर्यंत राहील. कोकणात 17 जुलैपर्यंत मुसळधारचा अंदाज असून, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातही पाऊस वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
उत्तर भारतात वार्यांना बळकटी मिळाल्याने तिथे अतिवृष्टी सुरू आहे. महाराष्ट्रात वार्यांचा वेग 14 जुलैपासून वाढण्यास सुरुवात होणार असून, पावसाचा जोरही वाढण्याची शक्यता आहे.
– अनुपम कश्यपी, हवामान अंदाजप्रमुख, पुणे वेधशाळा
हे ही वाचा :
शुगर फ्री पदार्थांमुळे कर्करोगाचा धोका
लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच करा : उद्धव ठाकरे
The post राज्यात शुक्रवारपासून मुसळधारची शक्यता appeared first on पुढारी.
What's Your Reaction?