राहाता : अखेर चितळी रोडने घेतला मोकळा श्वास..!

राहाता(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : अनेक वर्षांपासून शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिक- ठिकाणी असलेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर अखेर आज (सोमवारी) नगर पालिकेने जेसीबीसह हातोडा फिरवला. दरम्यान, जोपर्यंत मुख्य रस्ते व मुख्य बाजार पेठा मोकळा श्वास घेत नाहीत, तोपर्यंत ही मोहिम अविरत सुरुच राहिल, असा निर्धार मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी यावेळी व्यक्त केला. अनेक वर्षांपासून चितळी रोड, नगर – … The post राहाता : अखेर चितळी रोडने घेतला मोकळा श्वास..! appeared first on पुढारी.

राहाता : अखेर चितळी रोडने घेतला मोकळा श्वास..!

राहाता(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : अनेक वर्षांपासून शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिक- ठिकाणी असलेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर अखेर आज (सोमवारी) नगर पालिकेने जेसीबीसह हातोडा फिरवला. दरम्यान, जोपर्यंत मुख्य रस्ते व मुख्य बाजार पेठा मोकळा श्वास घेत नाहीत, तोपर्यंत ही मोहिम अविरत सुरुच राहिल, असा निर्धार मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी यावेळी व्यक्त केला.
अनेक वर्षांपासून चितळी रोड, नगर – मनमाड रोड, गळवंती मार्ग या मुख्य रस्त्यांवर अनधिकृत अतिक्रमणे झाली होती. यामुळे अनेक अपघात झाले. काहींना दुर्दैवाने जीव गमवावा लागला.

या पार्श्वभूमीवर राहाता शहरात मुख्याधिकारी आहेर यांनी धडक मोहीम हाती घेत मुख्य रस्त्यांसह मुख्य बाजार पेठांना अतिक्रमणमुक्त करीत मोकळा श्वास देण्याचे काम केले. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होणार असल्याने राहातेकरांकडून या मोहिमेचे स्वागत होत आहे.
मुख्याधिकारी आहेर यांनी अनधिकृत अतिक्रमण धारकांना स्वतः हुन अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले आहे. आहेर म्हणाले, नगर- मनमाड महामार्गावर दर दोन- तीन महिन्यांत अपघात होतो. कधी दुर्दैवाने मृत्यू देखील झाले.

यामुळे आमच्याकडे नागरिकांनी या रस्त्यावरचे अतिक्रमण काढावे, अशी मागणी होती. यामुळे अतिक्रमण मोहिम चितळी रोडने सुरु केली. ही मोहीम मुख्य रस्ते व बाजार पेठा अतिक्रमणमुक्त होईपर्यंत सुरुच राहणार आहे. मुख्य रस्त्यांचे अतिक्रमणे काढणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. जेथे जास्त अपघात होण्याची शक्यता आहे, असे मोठे रस्ते, नगर- मनमाड रोड, चितळी रोड, गळवंती मार्ग या रस्त्यांचे अतिक्रमण काढण्याचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्याधिकारी आहेर यांनी स्पष्ट केले.

अतिक्रमणे स्वतः काढून घ्यावी. मुख्यतः नगर- मनमाड रोड, गळवंती मार्ग, चितळी रोड येथे अनाधिकृत बांधकाम असल्यास पालिकेकडे अर्ज करावा. आम्ही प्राधान्याने बांधकाम पूर्ववत करण्यास प्रयत्न करू.

– तुषार आहेर, मुख्याधिकारी राहाता नगर पालिका

हेही वाचा

कोळपेवाडी : जवान आहेरांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

Shravan month : श्रावण सोमवार उपवास निज श्रावण महिन्यातच; १७ ऑगस्‍ट पासून होणार प्रारंभ

उत्तर भारतातील पुराने मध्य रेल्वेची दाणादाण, लांब पल्ल्याच्या गाड्यांना तब्बल १५ तास विलंब

The post राहाता : अखेर चितळी रोडने घेतला मोकळा श्वास..! appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow