लाखात पगार हवाय? मग आजच अर्ज करा, फक्त मुलाखतीद्वारे होणार निवड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

ESIC Recruitment 2025 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने ( Employees State Insurance Corporation) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. उमेदवारांनी अधिकृत साइटला भेट देऊन त्वरित अर्ज करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. पात्र उमेदवारांसाठीही मोठी संधी आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.  अर्ज करण्याची अंतिम तारीख  20 मार्च 2025  कर्मचारी राज्य विमा महामंडळाने ( Employees State Insurance Corporation) प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी या एकूण 113 पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू केली आहे. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवार 20 मार्च 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी कमाल वयोमर्यादा 69 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. ज्येष्ठ निवासी वयोमर्यादा कमाल 45 वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.  कोणत्या पदासाठी किती पगार मिळणार? प्राध्यापक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 1,23,100 रुपये प्रति महिना, सहयोगी प्राध्यापकांना 78,800 रुपये प्रति महिना, सहाय्यक प्राध्यापकांना 67,700 रुपये आणि वरिष्ठ निवासी पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 67,700 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. मुलाखतीद्वारे भरती केली जाईल. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे निवड केली जाईल. 27 मार्च 2025 रोजी मुलाखती होणार इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह आणि भरलेल्या अर्जासह डीन, ESIC मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, 6 वा मजला, नंदा नगर, इंदूर (MP)-452011 या पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे. 27 मार्च 2025 रोजी मुलाखत घेण्यात येईल. उमेदवार ESIC च्या अधिकृत वेबसाइट esic.gov.in वर जाऊन अर्ज डाउनलोड करू शकतात. दरम्यान, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. फक्त मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांनी ESIC बेवसाईटवर जाऊन सविस्तर माहिती पाहावी. या साईटवर सर्व माहिती दिली आहे. दरम्यान, ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत, त्यांनी 20 मार्चच्या आत अर्ज करणं गरजेचं आहे. कारण अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 20 मार्च आहे. त्यानंतर उमेदवारांना अर्ज करता येणार नाहीत. त्यामुळं लवकरात लवकर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.  महत्वाच्या बातम्या:  सरकारी नोकरी हवी असल्यास तमिळ लिहिता, वाचता आलीच पाहिजे; CBSE मध्ये शिकल्याने मातृभाषा शिकलो नाही म्हणणाऱ्या याचिकाकर्त्याला मद्रास हायकोर्टाने फटकारले

लाखात पगार हवाय? मग आजच अर्ज करा, फक्त मुलाखतीद्वारे होणार निवड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

ESIC Recruitment 2025 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने ( Employees State Insurance Corporation) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. उमेदवारांनी अधिकृत साइटला भेट देऊन त्वरित अर्ज करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. पात्र उमेदवारांसाठीही मोठी संधी आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख  20 मार्च 2025 

कर्मचारी राज्य विमा महामंडळाने ( Employees State Insurance Corporation) प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी या एकूण 113 पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू केली आहे. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवार 20 मार्च 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी कमाल वयोमर्यादा 69 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. ज्येष्ठ निवासी वयोमर्यादा कमाल 45 वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल. 

कोणत्या पदासाठी किती पगार मिळणार?

प्राध्यापक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 1,23,100 रुपये प्रति महिना, सहयोगी प्राध्यापकांना 78,800 रुपये प्रति महिना, सहाय्यक प्राध्यापकांना 67,700 रुपये आणि वरिष्ठ निवासी पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 67,700 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. मुलाखतीद्वारे भरती केली जाईल. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे निवड केली जाईल.

27 मार्च 2025 रोजी मुलाखती होणार

इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह आणि भरलेल्या अर्जासह डीन, ESIC मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, 6 वा मजला, नंदा नगर, इंदूर (MP)-452011 या पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे. 27 मार्च 2025 रोजी मुलाखत घेण्यात येईल. उमेदवार ESIC च्या अधिकृत वेबसाइट esic.gov.in वर जाऊन अर्ज डाउनलोड करू शकतात.

दरम्यान, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. फक्त मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांनी ESIC बेवसाईटवर जाऊन सविस्तर माहिती पाहावी. या साईटवर सर्व माहिती दिली आहे. दरम्यान, ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत, त्यांनी 20 मार्चच्या आत अर्ज करणं गरजेचं आहे. कारण अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 20 मार्च आहे. त्यानंतर उमेदवारांना अर्ज करता येणार नाहीत. त्यामुळं लवकरात लवकर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

महत्वाच्या बातम्या: 

सरकारी नोकरी हवी असल्यास तमिळ लिहिता, वाचता आलीच पाहिजे; CBSE मध्ये शिकल्याने मातृभाषा शिकलो नाही म्हणणाऱ्या याचिकाकर्त्याला मद्रास हायकोर्टाने फटकारले

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow