वस्ती शाळेतील निमशिक्षकांना सेवेत सामावून घेण्यासाठी उपोषण

वस्तीशाळा निमशिक्षकांना सेवेत सामावून घ्या:
मुख्य कार्यकारी अधिका-यांना निवेदन;आमरण उपोषणाला पाठिंबा
नंदूरबार प्रतिनिधी:वस्तीशाळा निमशिक्षकांना तात्काळ सेवेत सामावून घ्या,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद नंदूरबारचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,नंदूरबार जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव कोकणी,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी, एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश सोनवणे,जिल्हाध्यक्ष राजकुमार वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.शिक्षणाधिका-यांना लेखी पत्र द्यायला सांगतो,असे आश्वासन सीईओ यांनी दिले.बिरसा फायटर्स पदाधिका-यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांचीही भेट घेत निवेदन दिले.
बिरसा फायटर्स संघटनेने उपोषणकर्त्यांना आमरण उपोषणाला बिरसा फायटर्स संघटनेचा पाठिंबा देत आहोत, असे पत्र दिले. वस्तीशाळा शिक्षक आपल्या मागण्यांसाठी कुटुंबासह दिनांक २ ऑक्टोबर २०२३ पासून जिल्हा परिषद नंदूरबार समोर आमरण उपोषणास बसलेले आहेत. गेल्या १० वर्षापासून नंदूरबार येथील प्राथमिक शिक्षण विभागाला आठ दिवसाचा मुहूर्त मिळत नाही. सर्व शिक्षा अभियानाचे निमशिक्षक १० वर्षापासून जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभागात चकरा मारत आहेत. दिनांक०१/०४/२०१४ चा अधिनियमाचा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने उल्लंघन करून निमशिक्षकांना १० वर्षे सेवेपासून वंचित ठेवले आहे.प्राथमिक शिक्षण विभागाचा उदासिनतेमुळे सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी निमशिक्षकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.तरी सदर वस्तीशाळेतील निमशिक्षकांना तात्काळ सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करावी हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा परिषद नंदूरबार समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा परिषद नंदूरबार प्रशासनाला देण्यात आला आहे.
What's Your Reaction?






