विखे पाटलांच्या साखर कारखान्यास 296 कोटींची मदत; निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय
Ahilyanagar News : प्रवरा नगरमधील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या (Padma Shri Vitthalrao Vikhe Patil Sugar Factory) निवडणुका लवकरच होणार आहेत. कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) अहमदनगर जिल्ह्यातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या हमीवर राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) मार्फत 296 कोटी रुपयांचे खेळते भांडवल या कारखान्यास मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. आर्थिक मदत कोणाच्या फायद्याची ठरणार? कारण जिल्ह्यातील भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. या दोन्ही नेत्यांच्या गटांत साखर कारखान्यांच्या निवडणुकांवरून मोठी चुरस असते. विशेषतः संगमनेरमधील भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि प्रवरा नगरमधील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय समीकरणे आणि सहकार क्षेत्रातील हालचाली पाहता ही आर्थिक मदत नेमकी कोणाच्या बाजूने फायद्याची ठरणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रांताधिकारी हिंगे, आहेर यांच्यावर थोरात, विखे कारखान्याची जबाबदारी दरम्यान, नगरसह राज्यात नावलौकिक असणार्‍या संगमनेरच्या थोरात कारखाना आणि प्रवरानगरच्या विखे पाटील कारखान्यासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून आता निवडणूक निर्णय अधिकारी यांचीही नियुक्ती राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्या वतीने करण्यात आली आहे. यात संगमनेर साखर कारखान्यासाठी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश शालिग्राम हिंगे यांची नियुक्ती करण्यात आली असून या ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगमनेरचे तहसीलदार धीरज बाळासाहेब मांजरे काम पाहणार आहेत. तर डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासाठी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर काम पाहणारा असून त्यांना राहाता येथील तहसीलदार अमोल रमाकांत मोरे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मदत करणार आहेत. इतर महत्त्वाच्या बातम्या मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, सीएम फडणवीस म्हणाले, उत्तराधिकारी निवडण्याची वेळ... भाजपच्या नव्या अध्यक्षाची निवड पुढच्या आठवड्यात, जे. पी नड्डांनंतर या 4 नावांची चर्चा, संघाच्या सहमतीनं होणार निर्णय

Ahilyanagar News : प्रवरा नगरमधील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या (Padma Shri Vitthalrao Vikhe Patil Sugar Factory) निवडणुका लवकरच होणार आहेत. कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) अहमदनगर जिल्ह्यातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे.
राज्य सरकारच्या हमीवर राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) मार्फत 296 कोटी रुपयांचे खेळते भांडवल या कारखान्यास मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
आर्थिक मदत कोणाच्या फायद्याची ठरणार?
कारण जिल्ह्यातील भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. या दोन्ही नेत्यांच्या गटांत साखर कारखान्यांच्या निवडणुकांवरून मोठी चुरस असते. विशेषतः संगमनेरमधील भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि प्रवरा नगरमधील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय समीकरणे आणि सहकार क्षेत्रातील हालचाली पाहता ही आर्थिक मदत नेमकी कोणाच्या बाजूने फायद्याची ठरणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रांताधिकारी हिंगे, आहेर यांच्यावर थोरात, विखे कारखान्याची जबाबदारी
दरम्यान, नगरसह राज्यात नावलौकिक असणार्या संगमनेरच्या थोरात कारखाना आणि प्रवरानगरच्या विखे पाटील कारखान्यासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून आता निवडणूक निर्णय अधिकारी यांचीही नियुक्ती राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्या वतीने करण्यात आली आहे. यात संगमनेर साखर कारखान्यासाठी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश शालिग्राम हिंगे यांची नियुक्ती करण्यात आली असून या ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगमनेरचे तहसीलदार धीरज बाळासाहेब मांजरे काम पाहणार आहेत. तर डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासाठी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर काम पाहणारा असून त्यांना राहाता येथील तहसीलदार अमोल रमाकांत मोरे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मदत करणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
What's Your Reaction?






