शिर्डीत डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प, भूमिपूजन संपन्न; तरुणाईला रोजगार मिळणार, बॉम्ब शेल्सची निर्मित्ती होणार

अहिल्यानगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नारा देत उद्योग जगताला आणि उद्योजकांना पाठबळही दिले. त्याच धर्तीवर आता श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत देखील देशाच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या बॉम्ब शेल्सची निर्मिती देखील होणार आहे. साईबाबांच्या शिर्डीत (Shirdi) आता देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्ब शेल्सचे उत्पादन होणार आहे. त्याच अनुषंगाने शिर्डी एमआयडीसीमध्ये डिफेन्स क्लस्टरचा भूमीपूजन सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe patil), माजी खासदार सुजय विखे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत पार पडला. दरम्यान, शिर्डीत टाटा उद्योग समुहाचा देखील एक प्रकल्प लवकरच सुरू होईल, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला साजेसा महत्वाचा प्रकल्प शिर्डी येथे विकसित होत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये उभा राहत आहे. ग्लोबल फोर्ज कंपनीच्या माध्यमातून देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक बॉम्ब शेल्सचे उत्पादन या प्रकल्पातून होणार आहे. इथे उत्पादित होणारे बॉम्ब शेल्स भारतीय संरक्षक व्यवस्थेसह मित्र राष्ट्रांना पुरवले जाणार आहेत. येणाऱ्या काळात भारत हा जगाला मोठ्या प्रमाणात संरक्षण साहित्य पुरवणारा देश बनेल असा विश्वास ग्लोबल फोर्ज कंपनीचे संस्थापक गणेश निबे यांनी यावेळी व्यक्त केला. साईबाबांच्या पावन भूमीत हा प्रकल्प सुरू होत असल्याचा आनंद आहे. डिफेन्स क्लस्टरसह शिर्डी एमआयडीसीत टाटा उद्योग समूहाचा एक प्रकल्प देखील सुरू होतोय. शिर्डी एमआयडीसीमध्ये परिसरातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. येणाऱ्या काळात शिर्डीचा चेहरामोहरा बदलेला दिसेल, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भूमिपूजन सोहळ्यावेळी म्हटलं.  सर्वच कारखान्यांना मदत दरम्यान, विखे पाटील यांच्या साखर कारखान्याला सरकारने मदत केल्यासंदर्भातही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. केवळ एकच नव्हे तर राज्यातील अनेक कारखान्यांना मदत केली. राज्य सरकारचं नियंत्रण असावं म्हणून त्यांच्या माध्यमातून ही मदत केली जाते. शेतकऱ्यांच्या मालकीच्या साखर कारखान्यांच खासगीकरण होऊ नये यासाठीच हा सरकारचा प्रयत्न असल्याचेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.  राज ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करणाऱ्यांना आता उपरती झाली आहे. धर्मवीर संभाजी महाराज आपलं दैवत आहेत. प्रसिद्धीसाठी किंवा ज्यांना बलिदान समजलं नाही, ते आव्हानकारक वक्तव्य करतात. पण, त्या सर्वांना उशिरा सुचलेलं हे शहाणपण, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पलटवार केला. तर, लोकभावना काय म्हणते त्याचा आदर सर्वांनी केला पाहिजे. प्रत्येक वक्तव्यावर बोललं पाहिजे असं काही नाही. राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.   हेही वाचा Video: बबन गितेचा 'द एन्ड' केल्याशिवाय चप्पल घालणार नाही, आ. सुरेश धसांनी सांगितला वाल्मिकचा प्रण

शिर्डीत डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प, भूमिपूजन संपन्न; तरुणाईला रोजगार मिळणार, बॉम्ब शेल्सची निर्मित्ती होणार

अहिल्यानगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नारा देत उद्योग जगताला आणि उद्योजकांना पाठबळही दिले. त्याच धर्तीवर आता श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत देखील देशाच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या बॉम्ब शेल्सची निर्मिती देखील होणार आहे. साईबाबांच्या शिर्डीत (Shirdi) आता देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्ब शेल्सचे उत्पादन होणार आहे. त्याच अनुषंगाने शिर्डी एमआयडीसीमध्ये डिफेन्स क्लस्टरचा भूमीपूजन सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe patil), माजी खासदार सुजय विखे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत पार पडला. दरम्यान, शिर्डीत टाटा उद्योग समुहाचा देखील एक प्रकल्प लवकरच सुरू होईल, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला साजेसा महत्वाचा प्रकल्प शिर्डी येथे विकसित होत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये उभा राहत आहे. ग्लोबल फोर्ज कंपनीच्या माध्यमातून देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक बॉम्ब शेल्सचे उत्पादन या प्रकल्पातून होणार आहे. इथे उत्पादित होणारे बॉम्ब शेल्स भारतीय संरक्षक व्यवस्थेसह मित्र राष्ट्रांना पुरवले जाणार आहेत. येणाऱ्या काळात भारत हा जगाला मोठ्या प्रमाणात संरक्षण साहित्य पुरवणारा देश बनेल असा विश्वास ग्लोबल फोर्ज कंपनीचे संस्थापक गणेश निबे यांनी यावेळी व्यक्त केला.

साईबाबांच्या पावन भूमीत हा प्रकल्प सुरू होत असल्याचा आनंद आहे. डिफेन्स क्लस्टरसह शिर्डी एमआयडीसीत टाटा उद्योग समूहाचा एक प्रकल्प देखील सुरू होतोय. शिर्डी एमआयडीसीमध्ये परिसरातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. येणाऱ्या काळात शिर्डीचा चेहरामोहरा बदलेला दिसेल, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भूमिपूजन सोहळ्यावेळी म्हटलं. 

सर्वच कारखान्यांना मदत

दरम्यान, विखे पाटील यांच्या साखर कारखान्याला सरकारने मदत केल्यासंदर्भातही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. केवळ एकच नव्हे तर राज्यातील अनेक कारखान्यांना मदत केली. राज्य सरकारचं नियंत्रण असावं म्हणून त्यांच्या माध्यमातून ही मदत केली जाते. शेतकऱ्यांच्या मालकीच्या साखर कारखान्यांच खासगीकरण होऊ नये यासाठीच हा सरकारचा प्रयत्न असल्याचेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले. 

राज ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करणाऱ्यांना आता उपरती झाली आहे. धर्मवीर संभाजी महाराज आपलं दैवत आहेत. प्रसिद्धीसाठी किंवा ज्यांना बलिदान समजलं नाही, ते आव्हानकारक वक्तव्य करतात. पण, त्या सर्वांना उशिरा सुचलेलं हे शहाणपण, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पलटवार केला. तर, लोकभावना काय म्हणते त्याचा आदर सर्वांनी केला पाहिजे. प्रत्येक वक्तव्यावर बोललं पाहिजे असं काही नाही. राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.  

हेही वाचा

Video: बबन गितेचा 'द एन्ड' केल्याशिवाय चप्पल घालणार नाही, आ. सुरेश धसांनी सांगितला वाल्मिकचा प्रण

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow