संगमनेर : बिबट्याचे अवयव विक्री; एक अटक
संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : बिबट्याचे मृगया चिन्ह, दात, सुळे व मिशांची खरेदी- विक्रीच्या खबर्यामार्फत गुप्त माहितीवरुन पोलिसांनी चंदनापुरी येथे तिघांपैकी दोघांना रंगेहाथ पकडले होते. दरम्यान, फरार आरोपी सुशांत उत्तम भालेराव याला बुधवारी (दि. 12) दुपारी अटक केली. त्याला दोन दिवसांची वन कोठडी दिल्याची माहिती वन क्षेत्रपाल भाग एकचे सचिन लोंढे यांनी दिली. तालुक्यातील … The post संगमनेर : बिबट्याचे अवयव विक्री; एक अटक appeared first on पुढारी.


संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : बिबट्याचे मृगया चिन्ह, दात, सुळे व मिशांची खरेदी- विक्रीच्या खबर्यामार्फत गुप्त माहितीवरुन पोलिसांनी चंदनापुरी येथे तिघांपैकी दोघांना रंगेहाथ पकडले होते. दरम्यान, फरार आरोपी सुशांत उत्तम भालेराव याला बुधवारी (दि. 12) दुपारी अटक केली. त्याला दोन दिवसांची वन कोठडी दिल्याची माहिती वन क्षेत्रपाल भाग एकचे सचिन लोंढे यांनी दिली.
तालुक्यातील चंदनापुरी येथे शुक्रवार दि. 19 मे रोजी रात्री 10 वाजता वन विभागाला मिळालेल्या माहितीवरुन बनावट ग्राहक बनुन यशस्वी सापळा रचण्यात आला. यात दोघांना अटक करण्यात आली होती तर एकजण पसार झाला होता. त्याच्याकडून विक्रीस आणलेले साहित्य जप्त करण्यात आले होते.
वन विभागाने सापळा रचून हे साहित्य खरेदी करण्यासाठी बनावट ग्राहक बनून अधिकारी व कर्मचारी गेले होते. तेव्हा बिबट्याचे अवयव विक्रीसाठी श्रीराम यादव सरोदे (वय 34 वर्षे, रा. चंदनापुरी, आनंदवाडी, सुधीर विजय भालेराव (वय 30 वर्षे, (आनंदवाडी) व सुशांत उत्तम भालेराव (रा. चंदनापुरी) हे तिघे तेथे आले होते. वेषांतर करुन गेलेल्या अधिकार्यांनी सदर अवयव खरेदी करण्यासाठी तरुणांशी चर्चा केली. साहित्य पाहुन ते बिबट्याचेच अवयव असल्याची खात्री करून आसपास इतर अधिकारी व कर्मचार्यांनी तत्काळ त्या तरुणांवर झडप घातली. आपण पकडलो गेलो, हे लक्षात येताच त्यांनी झटापट केली.
यात श्रीराम सरोदे व सुधीर भालेराव या दोघांना पकण्यात यश आले, मात्र तिसरा साथीदार सुशांत भालेराव पळून जाण्यात यशस्वी झाला. तेव्हापासून तो पसार होता. वन विभाग त्याचा शोध घेत होता. मिळालेल्या माहिती नुसार सुशांत शिर्डी रहात होता. तेथे कारवाई करीत बुधवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास त्याला पकडले. दोन दिवसांची वन कोठडी सुनावली. उपवनसंरक्षक सुवर्णा माने व स. वन संरक्षक संदीप पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी संगमनेरच्या टीमसह सचिन लोंढे, वनपाल ताजने, शहारुन सय्यद, बुरांडे, पवार, देशमुख, कोळी, सातपुते, कोरडे, श्रीमती जाधव, बेंद्रे हे कर्मचारी कारवाईत सहभागी होते.
हेही वाचा :
Maharashtra Politics | १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस
The post संगमनेर : बिबट्याचे अवयव विक्री; एक अटक appeared first on पुढारी.
What's Your Reaction?






