हातांच्या नखांचा रंग पाहून ओळखा आपल्या आरोग्याची स्थिती
आपले शरीर आपल्याला अनेक आजारांचे संकेत देत असते. हे संकेत ओळखता आले तर वेळीचा उपचार करून तुम्ही मोठा धोका टाळता येऊ शकतो. अशाच प्रकारे नखांच्या स्थितीवरून अनेक आजारांचे संकेत मिळू शकतात.
चला तर मग नखांच्या रंगावरून आरोग्याची स्थिती जाणून घेवूयात...
● नखांची चमक जाणे, कोरडी, कमजोर होणे :
जर नखाची चमक गेली आणि ती कोरडी आणि कमजोर दिसत असल्यास थॉयरॉईडसारख्या समस्येने ग्रस्त असल्याचे हे लक्षण आहे. कोरडी आणि कमजोर नखे होण्याचे कारण फंगल इन्फेक्शन देखील असू शकते.
● जाड नखे :
काही लोकांची नखे अधिक जाड असतात, ती कापण्यास अधिक त्रास होतो. याकडे दुर्लक्ष करू नका. कारण नखे जाड होणे एक नव्हे तर अनेक आजारांचे लक्षण असू शकते. मधुमेह, फुफ्फुसात संसर्ग, अर्थरायटिस आदींचे लक्षण असू शकते.
● वक्राकार नखे :
ज्यांची नखे वक्र असतात त्यांना काही ना काही अनुवांशिक आजार, लीव्हरबाबत समस्या, हायपोक्रोमिक अॅनिमियाचा संकेत देणारा कायलोंनायचिया आजार देखील असू शकतो.
● पांढरे डाग, किंवा पांढरी नखे :
जर नखावर पांढरे डाग किंवा संपूर्ण नखेच पांढरी झाली तर हे लक्षणे व्यक्तीच्या लीव्हर किंवा हृदयाबाबत समस्या असू शकते. जर नखांच्या किनार्यावर पांढर्या रंगाची लाईन दिसल्यास व्यक्तीला तणाव शरीरात पोषणाच्या कमतरतेचा संकेत असू शकतो.
● पिवळी नखे :
पिवळ्या नखाच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक फंगल संसर्ग आहे. संसर्ग वाढल्याने नखे जाडी होतात आणि निघू शकतात. दुर्मिळ प्रकरणात, पिवळी नखे जास्त गंभीर स्थितीचा संकेत देऊ शकतात जसे की गंभीर थायरॉईड रोग, काविळ, फुफ्फुसाचा आजार, डायबिटीज किंवा सोरायसिस.
● निळ्या रंगाची नखे :
निळ्या रंगाची नखे असण्याचा अर्थ आहे की, शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सीजन मिळत नाही. हा फुफ्फुसाच्या समस्येचा संकेत असू शकतो. काही हृदयाच्या समस्यांमध्ये नखे निळी होऊ शकतात.
● गडद रंगाची नखे :
जर तुमच्या नखांचा रंग तपकिरी किंवा अधिक गडद असल्यास थायरॉईड किंवा शरीरात पोषकतत्वांची कमतरता असू शकते. नखांचा रंग लाल असणे ब्लड प्रेशरच्या समस्येचा संकेत असू शकतो.
● नखांची चमक जाणे :
नखांची चमक जाणे, शरीरात पोषकतत्वांची कमतरता किंवा इन्फेक्शनकडे इशारा करते. नखांमध्ये असे बदल दिसले तर डॉक्टरांकडे जावे.
What's Your Reaction?






