Beed News Latest Update

उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.20) वडवणी पोलीस ठाण्यात 10 हजार रुपयांची लाच घेताना कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले. रेवणनाथ गंगावणे असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रार आल्यानंतर अवघ्या दोन तासात ही कारवाई करण्यात आली आहे. या ठाण्यात सहायक निरीक्षक आनंद कांगूने हे आल्यापासून या ठाण्यात लाचखोरी अधिकच वाढल्याची माहिती आहे.
What's Your Reaction?






