शॉर्ट सर्किट मुळे होरपळून 19 वर्षीय मुलाचा मृत्यू

बीड प्रतिनिधी :- बीड शहरातील सर्कस ग्राउंड भक्ती कन्स्ट्रक्शन भागामध्ये, एका घरी शॉर्टसर्किट होऊन मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये 19 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यावेळी घटनास्थळी तात्काळ पोलीस आणि अग्निशामक दल दाखल झाले होते.
बीड शहरातील भक्ती कन्स्ट्रक्शन भागात सर्कस ग्राउंड जवळ विकास डावकर यांचे घर असून,आज रविवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान घरातील सर्व सदस्य बाहेर गेले होते. मात्र एकटाच त्यांचा 19 वर्षीय मुलगा प्रसाद डावकर हा घरी होता. मात्र अचानक दुर्दैवाने त्यांच्या घरामध्ये शॉर्टसर्किट झाले. आणि घराच्या काचा फुटल्या तसेच या शॉर्टसर्किटच्या स्फोटामध्ये दुर्दैवाने प्रसादचा होरपळून मृत्यू झाला. आवाज एवढा भीषण होता की, परिसरातील सर्व नागरिकांनी तात्काळ याकडे धाव घेतली. घटनास्थळी अग्निशामक दल आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे एपीआय गुरले, कप्पे, धारकर यांनी धाव घेतली. तेव्हा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता व पाहणी केली असता, शॉर्टसर्किटमुळे मुलाचा होरपळून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी तात्काळ मृतदेह जिल्हा रुग्णालय बीड येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. सदर घटनेने बीड शहरासह जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?






