भारतात 20 विद्यापीठ बोगस
बीड( प्रतिनिधी) : विश्वविद्यालय अनुदान आयोग यूजीसी नवी दिल्ली ने नुकतेच भारतातील वीस बोगस विद्यापीठाची घोषणा केली आहे.भारतात यूजीसी मान्यताप्राप्त एकूण 911 विद्यापीठे तथा विश्वविद्यालय असून यात 400 राज्य विद्यापीठ, 126 मानद विद्यापीठ ,40 केंद्र सरकारचे विद्यापीठ ,337 खाजगी यूजीसी मान्यता प्राप्त विद्यापीठ असे एकूण 911 विद्यापीठ आहेत.भारतात वीस विद्यापीठ बोगस असून त्याची यादी नुकतीच यूजीसीने युजीसीच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे.यात महाराष्ट्रातील राजा अरेबिक यूनिवर्सिटी नागपूर चा समावेश आहे .बोगस विद्यापीठांची संख्या पुढील प्रमाणे आंध्र प्रदेश- दोन, दिल्ली -आठ ,कर्नाटक - एक, महाराष्ट्र -एक , केरळा - एक, पा़ँडेचेरी- एक ,उत्तर प्रदेश - चार, पश्चिम बंगाल- दोन असे एकूण 20 बोगस विद्यापीठाचा समावेश आहे. या विद्यापीठात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असे अहवाल नुकतेच यूजीसी ने केले आहे. बोगस विद्यापीठाची यादी आपल्या यूजीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलीआहे .बीड जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी काही दलालामार्फत बोगस विद्यापीठात प्रवेश घेऊन फसलेली आहेत .तरी यूजीसी सलग्न मान्यताप्राप्त विद्यापीठात तथा विश्वविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन करिअर कौन्सिलर डॉ. संजय तांदळे बीड यांनी केले आहे.
What's Your Reaction?