बीड मतदारसंघातील रस्त्यांसाठी 25 कोटीचा निधी मंजूर
बीड प्रतिनिधी:- मतदार संघातील चार अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या कामासाठी २५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक नेते बळीराम गवते यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान या रस्त्यांच्या कामाला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी करत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून चार रस्त्यांच्या कामासाठी २५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येईल.यामध्ये बीड मतदारसंघातील राज्य मार्ग २११- बीड नागझरी बॅनसुर भावाळा वैद्यकिन्ही - - वैजाळा पाचेगाव पाच्छी रस्त्याच्या एका टप्प्याच्या सुधारणा व रुंदीकरणासाठी ८ कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्यातील सुधारणा व रुंदीकरणासाठी ७ कोटी रुपये त्याचबरोबर उमरज जहांगीर से केतुरा रस्ता सुधारणा कामासाठी ४ कोटी रुपये आणि म्हसोबा फाटा - पिंपरगव्हाण से आर टी ओ रस्ता सुधारणा करण्यासाठी ६ कोटी असे एकूण २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
What's Your Reaction?