बीड जवळ वारकऱ्यांचा टेम्पो पलटला 25 जण जखमी

बीड जवळ वारकऱ्यांचा टेम्पो पलटला 25 जण जखमी

बीड प्रतिनिधी: पंढरपूरहून बीडकडे परतीच्या प्रवासाला असणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास 25 वारकरी जखमी झाले असून ३ महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टेम्पो पिकअपचे टायर फुटल्याने अपघात झाला आहे. वारकरी कन्नड तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी आहेत.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील दहिगाव येथील वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेला होते. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर ते आज रात्री टेम्पोने बीडच्या दिशेने निघाले होते. दरम्यान बीडनजीक पोहचात त्यांच्या वाहनाचा अपघात भीषण अपघात झाला.या अपघातात जवळपास 25 वारकरी जखमी झाले आहेत. त्यापैकी ३ महिला वारकरी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टेम्पो पिकअपचे टायर फुटल्याने अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow