57 लाखाची फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या
बीड प्रतिनिधी:- बीड मधील डॉक्टरची सत्तावन लाख वीस हजाराची जास्त नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या, बिहारमधील पाच भामट्याच्या सायबर पोलिसांनी मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून साहित्य जप्त केले आहे. सदर कारवाई शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता केली आहे
बीड शहरातील डॉक्टर विठ्ठल क्षीरसागर यांनी ऑनलाइन सोशल मार्केटिंग साइटवर फॉरेक्स ट्रेडिंग साठी इच्छुक झाले होते त्यानंतर एक लिंक पाठवून त्यात सर्व वैयक्तिक माहिती भरली. १० नोव्हेंबर रोजी क्षीरसागर यांनी ४० हजार रूपये गुंतवणूक केली. त्याचे १५ नोव्हेंबरला ४५ हजार २०० रूपये नफा स्वरूपात मिळाले. त्यामुळे यांचा विश्वास बसला. त्यानंतर वेगवेगळ्या दिवशी आणखी पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. ५७ लाख २० हजार रूपये गुंतवणूक झाल्यावर ४ डिसेंबर २०२३ रोजी त्यांना गुंतवणूक केलेल्या नफ्यावर तुम्हाला ३६ लाख रूपये टॅक्स बसला आहे. तो भरा,असे सांगितले. परंतु डॉ. क्षीरसागर यांनी हे पैसे मिळणाऱ्या नफा रकमेतून कपात करा आणि बाकीचे पैसे परत करा, असा आग्रह धरला. त्यानंतर त्यांनी वारंवार मेसेज केले, परंतु त्यावर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यावरून त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी ५ जानेवारी २०२४ रोजी तत्काळ सायबर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सायबर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. बिहारमध्ये जावून पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सदर कारवाई शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता केली ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बीडच्या सायबर विभागाने केली आहे.
What's Your Reaction?