८१ कोटी रुपयांच्या अपहार
दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील आरोपी कॅशियर उत्तम शंकर लांडगे हा स्वतःहून अहमदनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसमोर हजर झाला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली. याबाबत पोलिसांनी सांगितले, की लांडगे हा दुधगंगा पतसंस्थेत क्लार्क, कम कॅशियर या पदावर अपहार कालावधीत कार्यरत होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायाधीश वाय. एच. अमेटा यांनी लांडगे यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली. याबाबत पोलिसांनी सांगितले, की लांडगे हा दुधगंगा पतसंस्थेत क्लार्क, कम कॅशियर या पदावर अपहार कालावधीत कार्यरत होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायाधीश वाय. एच. अमेटा यांनी लांडगे यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
What's Your Reaction?






