येथे दोन तासात 90 मिलिमीटर पाऊस पडला

नागपूर प्रतिनिधी :- पावसासाठी तरसलेल्या नागपूरमध्ये शुक्रवारी मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण ११६.५ मिमी नोंद झाली. त्यापैकी ९० मिमी पाऊस हा रात्री २ ते पहाटे ४ या दोनच तासांत कोसळला. त्यामुळे प्रमुख रस्त्यांना नद्यांचे रूप आले होते.
एनडीआरएफ व बचाव पथकाच्या जवानांनी ४०० हून अधिक नागरिकांना पुरातून सुरक्षितस्थळी हलवले. काही ठिकाणी तर बोटींचाही वापर करावा लागला. मात्र दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा-महाविद्यालयांना एक दिवस सुटी जाहीर केली होती. यापूर्वी २६, २७, २८ व ३१ जुलै रोजीही नागपुरात मुसळधार पाऊस झाला होता. २७ जुलै रोजी सर्वाधिक सरासरी १७३.७ मिमी नोंद झाली होती. सप्टेंबरच्या महिनाभरात नागपुरात सरासरी १८३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असताना त्यापैकी ६४% (११६.५) पावसाची शनिवारी एकाच दिवशी नोंद झाली आहे .
What's Your Reaction?






