ऊस तोडणी उचलीची बाकी न दिल्याने एकाचे अपहरण तलवाडा ठाण्यात गुन्हा दाखल

गेवराई तालुक्यातील सेलू तांडा येथे ऊस तोडणीच्या उचलीची बाकी राहिल्याने एकाचे अपहरण केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बळीराम पिराजी राठोड हे जातेगाव येथे फवारणीचे औषध आनण्यासाठी गेले होते.त्यावेळी कृष्णा गोटीराम पवार यानी तु आमच्या कारखाण्याच्या ऊस तोडीच्या उचलीच्या पैश्याची बाकी का दिली नाहीस असे म्हणत फिर्यादीचे पती बळीराम पिराजी राठोड यांना कृष्णा गोटीराम पवार राजालेगाव तांडा ता. गेवराई जि. बीड यांनी त्यांचे त्यांचे अपहरण केले.आणि प्रकाश बळीराम राठोड रा. काठोडा तांडा यानी याने दि. 25/07/2023 रोजी पहाटे 05.01 वा. चे सुमारास मुलगा अर्जुन बळीराम राठोड यांचे मोबाईल क्र 9028126336 यावर अनोळखी मोबाईल नं- 7517906525 या मोबाईल वरून फोन केला तेंव्हा तिच्या पतीने फोनवर की, व्यवहाराचे पैसे दिले नाहीत तर मला जिवे मारण्याची धमकी देत आहेत. असे म्हणून फोन कट केला. अशी फिर्याद तलवाडा पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी पत्नी संजीवनी बळीराम राठोड यांच्या फिर्यादीवरून तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास तलवाडा पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?






