गावंधरा उपळी शिवारात कुंडलिका नदीपात्रात महिलेचे प्रेत आढळले

सुनील जाधव बीड/धारूर - गावंधरा उपळी शिवारात कुंडलिका नदीपात्रात एका महिलेचे प्रेत आढळून आल्याने, परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. तात्काळ नागरिकांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे.
बी ड जिल्ह्यातील धारूर आणि वडवणी या दोन तालुक्याच्या सीमेवर गावंधरा उपळी शिवारामध्ये, कुंडलिका नदीपात्रामध्ये, आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळच्या दरम्यान एका महिलेचे नदीपात्रात प्रेत आढळून आले आहे. सदर महिला अंदाजे 40 ते 45 वयाची असावी असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे .सदर घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये खळबळ उडाली. नागरिकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तात्काळ या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली आहे. मात्र सदरील प्रेत कोणत्या महिलेची आहे हे अद्याप समजू शकले नाही मात्र सदरील महिला या परिसरातील नसावी असा अंदाज त्या ठिकाणच्या नागरिकांनी व्यक्त केलाय.
What's Your Reaction?






