लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
बीड: तालुक्यातील लोणी शहाजहानपुर येथे गळफास घेऊन शेतकऱ्यांने आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीड तालुक्यातील लोणी शहाजहानपुर येथे, लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बीड तालुक्यातील शहाजनपुर लोणी येथील अंगद मदनराव लोणकर वय ३६ वर्षे असे त्या मयत शेतकऱ्याचे नाव आहे. या अल्पभुधारक तरून शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार दि २१ रोजी घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुण शेतक-याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने, परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?