चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
कुंबेफळ येथे एका शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन नैराश्यात येऊन आपली जीवन यात्रा संपवली, सदर घटनेने परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेतकरी महेश भागवत थोरात वय 30 वर्ष रा. कुंभेफळ या शेतकऱ्याच्या शेतामध्ये दुबार पेरणीची संकट ओढावले होते. अगोदर केलेला खर्च वाया गेला. पुन्हा डबल खर्च करण्याची गरज होती. मात्र यामुळे शेतकरी महेश भागवत थोरात हे नैराश्यात आले होते .आणि याच नैराश्यातून आज पहाटेच्या दरम्यान घरासमोरील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली सदर घटना आज रविवारी पहाटेच्या दरम्यान घडली. सदर घटनेची माहिती तात्काळ नागरिकांनी युसूफ वडगाव पोलिसांना दिली. त्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोलीस दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे पाठवला. सदर घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?