एम पी डी ए अंतर्गत एका गुंडाची हर्सूल कारागृहात रवानगी

एम पी डी ए अंतर्गत एका गुंडाची हर्सूल कारागृहात रवानगी

बीड प्रतिनिधी:- बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुंडगिरीचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून MPDA कायद्या अंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर MPDA कायदयाअंतर्गत कार्यवाही करण्याचे योजिले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक, बीड यांचे सुचनेवरून पोलीस निरीक्षक श्री. आजिनाथ काशीद पोलीस ठाणे पेठ बीड यांनी दिनांक 03/08/2023 रोजी इसम नामे शेख अख्तर शेख रशीद वय 30 वर्षे रा. अचानक नगर, बिलाल मज्जीद जवळ, गांधीनगर बीड ता. जि. बीड याचे विरुद्ध MPDA कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी साहेब बीड यांना सादर केला होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow