एम पी डी ए कायद्यांतर्गत एका गुंडाची हर्सूल कारागृहात रवानगी

बीड प्रतिनिधी: MPDA कायद्याअंतर्गत केज शहरातील एका धोकादायक गुंडाची हर्सल कारागृहात रवानगी केली आहे सदर प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी यांना सादर केला होता.
बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुंडगिरीचे समूळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन MPDA कायद्या अंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजिले आहे. या पार्श्वभुमीवर पो.नि. श्री. प्रशांत महाजन पोलीस ठाणे केज यांनी दिनांक 06.06.2024 रोजी इसम नामे उमेर ऊर्फ पापा मुस्ताक फोराकी वय 28 वर्षे रा. रोजा मोहल्ला केज ता. केज जि. बीड याचे विरुद्ध MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी साहेब बीड यांना सादर केला होता.
सदर स्थानबध्द इसमा विरुध्द पोलीस ठाणे केज येथे खुनाचा प्रयत्न करणे, बलात्कार करणे, पळवुन नेणे, जबरी चोरी करणे, चोरी करणे, दुखापत करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, घराविषयीक आगळीक करणे, गैरकायदयाची मंडळी जमविणे, दंगा करणे, अवैदय शस्त्रे बाळगणे वगैरे स्वरुपाचे एकुण 12 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. त्यापैकी 09 गुन्हे न्यायप्रविष्ठ व 03 गुन्हे पोलीस तपासावर आहेत. तसेच नमुद इसमावर त्याने आपली वर्तनुक सुधारावी म्हणुन यापुर्वी CrPC कलम 110 प्रमाणे दिनांक 21/07/2023 रोजी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा चढत्या क्रमाने गुन्हे करण्याची श्रृंखला चालुच ठेवुन होता. त्याची केज शहरात व परीसरात प्रचंड दहशत आहे. त्याचे विरुध्द लोक फिर्याद देण्यास अथवा साक्ष देण्यास समोर येत नाहीत. तो सर्वसामान्य लोकांना त्रास देवुन दहशत निर्माण करुन व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहचवत होता.
सदर प्रकरणात श्री. अविनाश पाठक जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिनांक 10.07.2024 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हसुल कारागृह छ. संभाजीनगर येथे हजर करून स्थानबध करणे बाबत आदेश पारीत केले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना पो.स्टे. केज व पो. नि. स्थागुशा बीड यांना दिल्या होत्या. त्यानंतर पो.नि. श्री. उस्मान शेख यांचे सुचनेवरुन पोउपनि श्रीराम खटावकर व त्यांचे टीमने सदर प्रस्तावित स्थानबद्ध इसमास दि. 11.07.24 रोजी ताब्यात घेवुन पो.स्टे. केज येथे 13.30 वा. हजर केले त्यांनतर पो.नि. केज यांनी दिनांक 11.07.2024 रोजी सदर इसमास कायदेशीररीत्या ताब्यात घेऊन योग्य पोलीस बंदोबस्तात हर्सल कारागृह, छ. संभाजीनगर येथे हजर करुन स्थानबध्द केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर, अपोअ अंबाजोगाई, श्रीमती चेतना तिडके सहा.पो.अ. केज श्री. कमलेश मीणा पो.नि. श्री. उस्मान शेख स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. प्रशांत महाजन, पोउपनि राजेश पाटील, पो.अं. मुंडे, गिते, सर्व पो.स्टे. केज तसेच पोउपनि श्रीराम खटावकर, पोह/अभिमन्यु औताडे, पी.टी. चव्हाण, सानप, नारायण कोरडे, आश्विनकुमार सुरवसे, नेमणुक स्थागुशा बीड यांनी केलेली आहे. भविष्यातही वाळुचा चोरटा व्यापार करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांचेवर व दादागिरी करणाऱ्या व खंडणी बहाद्दर धोकादायक गुंडावर जास्तीत जास्त MPDA कायदयाअंतर्गत आगामी विधानसभा निवडणुक संबंधाने कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर यांनी दिले आहेत.
What's Your Reaction?






