रामपुरी येथे पहाटे घराला भीषण आग लागली

बीड प्रतिनिधी: रामपूरी येथील पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घराला भीषण आग लागली असून, यामध्ये साडेतीनशे क्विंटल कापूस आणि संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. तात्काळ घटनास्थळी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.
गेवराई तालुक्यातील रामपुरी येथे पहाटेच्या दरम्यान घराला भीषण आग लागली असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अंकुश जगदीश मस्के असे त्या घरमालकाचे नाव आहे. शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर शेतकरी बागायतदार असून घरामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस असल्याचे सांगण्यात आले. सदर घटना घडताच तात्काळ गेवराई येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. सदर आग आज बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान लागली. यामध्ये सदर शेतकऱ्याचा साडेतीनशे क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. सदर घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून, मात्र घरात साठवून ठेवलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये घरातील संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. घटनास्थळी अग्निशामक दल दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
What's Your Reaction?






