डोक्यात दगड घालून मजुराचा खून
धानोरा बुद्रुक येथील एका मजुराचा डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील रहिवासी महादेव गोरोबा काळुंके वय 40 वर्ष असे त्या मयताचे नाव आहे,त्याचा मृतदेह स्वतः च्या घरापासून 100 मीटर अंतरावर चुलत भावाच्या निदर्शनास आला. त्याने त्यास उठवण्याचा प्रयत्न केला ,मात्र त्याने कोणताही प्रतिसाद न दिल्याने याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने सदर घटनेची माहिती घरच्यांना सांगितली. त्यानंतर नागरिकांनी सदर घटनेची माहिती अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना दिली. यावेळी तात्काळ अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली .
ब्रेकिंग : भाजपचा बडा नेता काँग्रेसमध्ये
सदर घटनेचा पंचनामा केला. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी चोरमले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान हा खून कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झाला नाही. याचा पुढील तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?