बस सेवा सुरू करण्यासाठी आगार प्रमुखांना निवेदन
परळी वैजनाथ ते सोनपेठ हा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. या रूटवर पुर्वी संध्याकाळी परळी ते सोनपेठ अशी मुक्कामी बस होती. मात्र मध्यंतरीच्या काळात ही बस बंद करण्यात आली. यामुळे संध्याकाळी परळीहून संगम, बेलंबा, कौठळी, इंजेगाव, डिघोळ आदी गावांना जाणाऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. तर सकाळी याच गावातुन परळीला येणाऱ्या विद्यार्थी, नागरीकांचीही अडचण होत होती. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. ही बाब लक्षात घेऊन इंजेगावच्या सरपंच सौ. विद्या अमोल कराड यांनी बस सुरू करण्यासाठी आमदार धनंजय मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आगारप्रमुखांना निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला.
अखेर सरपंचांच्या मागणी आणि पाठपुराव्याला यश आले आहे. याकामी इंजेगावचे सुपुत्र विभागीय वाहतूक अधिक्षक श्री. शिवराज हरिभाऊ कराड यांनी मोलाचे सहकार्य केले. यामुळेच उद्या दि. 19 जुन पासुन दोन मुक्कामी बस सुरू होणार आहेत. परळी ते सोनपेठ अशा दोन बस संध्याकाळी 7.00 आणि 8.00 वाजता मुक्कामी बस सुरू होत आहेत. नागरीकांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा. सरपंच विद्या अमोल कराड यांनी केले आहे.
What's Your Reaction?