वीज अंगावर पडल्याने बैल जोडीचा मृत्यू

बीड प्रतिनिधी: वीज अंगावर पडून बैलजोडीचा मृत्यू झाल्याची घटना माजलगाव तालुक्यातील गुजरवाडी येथे घडली आहे. सदर घटना आज शनिवार दिनांक 21 रोजी घडली आहे. सदर घटनेने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन-चार दिवसात विश्रांती नंतर आज पावसाने पुन्हा डोके वर काढले. आज काही भागात बीड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. यादरम्यान विजांचा कडकडाट होताना दिसून आला. माजलगाव तालुक्यातील गुजरवाडी शिवारात पात्रुड गट नंबर 274 मध्ये शेतकरी राजेभाऊ परशुराम नावडकर यांची बैलजोडी शेतात बांधावर चरत असताना, मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती.पावसाने विजेच्या कडकडाटा सह जोरदार पावसानी हजेरी लावल्याने. त्यात शेतकऱ्यांच्या बैल जोडीवर वीज कोसळून बैल जोडीचा मृत्यू झाला. यामध्ये शेतकऱ्याच्या लाखोंच्या पशुधनाचे नुकसान झाले .घटनेची माहिती मिळताच तहसिलदार संतोष रुईकर यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेची पाहणी केली व शेतकऱ्याला धीर दिला.
What's Your Reaction?






