पुणे- अहमदनगर महामार्गावर आढळला अर्धवट जळालेला मृतदेह
पुणे अहमदनगर महामार्गावर शिक्रापुर जवळील सणसवाडी येथे एका अज्ञाताचा खून करून मृतदेह जाळून टाकल्याचे उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे शिक्रापूर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पुणे नगर महामार्गावर (Pune- Nagar Highway) एका खड्यातून धुर निघत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. यावेळी काही प्रवाशांनी पाहिले असता अर्धवट अवस्थेत मृतदेह जळत असल्याचे प्रवाशांना पहायला मिळाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या धक्कादायक प्रकारानंतर प्रवाशांनी माहिती शिक्रापूर पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी (Shikrapur Police) घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृतदेह मोठ्या प्रमाणावर जळाल्याने तो पुरूषाचा आहे की महिलेचा हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, कोल्हापूरमध्येही अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूरच्या कागल-निढोरी राज्य मार्गावर बामणी हद्दीतील शेतात गोटखिंडी इथल्या एका तरुणाचा मृतदेह काल रात्री टाकण्यात आला आहे. या तरुणाच्या डोक्यात वाराच्या खुणा आहेत. या तरुणास इतर ठिकाणी मारून या ठिकाणी मृतदेह आणून टाकला आहे.
अमरसिंह दत्ताजीराव थोरात (amarsinh thorat) (वय ३८) राहणार गोटखिंडी ता. वाळवा जि. सांगली असे या तरुणाचे नाव असल्याचे समजले. कोल्हापूर इथल्या शहाजी लॉ कॉलेज मध्ये द्वितीय वर्षात अमरसिंह शिकत असल्याचे समजते.
What's Your Reaction?