दहा हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी पकडला

दहा हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी पकडला
प्रतिकात्मक फोटो

एन सी निकाली काढण्यासाठी वडवणी पोलीस ठाणे अंतर्गत, एका पोलीस कर्मचाऱ्याने 10 हजाराची लाच घेतली. हीच लाच स्वीकारताना उस्मानाबाद एसीबीने त्या पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले. सदर कारवाई आज दुपारी केली आहे.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील वडवणी पोलीस ठाणे अंतर्गत, एका ठिकाणी शेतीच्या वादातून एक शिक्षक आणि त्याचा भाऊ यांच्यावर एन सी दाखल करण्यात आली होती. सदर एनसी निकाली काढण्यासाठी वडवणी पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत असणारा पोलीस कर्मचारी रेवननाथ गंगावणे याने 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी नंतर दहा हजार रुपयाची लाच देण्याचे ठरले. हेच दहा हजार रुपये स्वीकारताना पोलीस कर्मचारी रेवनाथ गंगावणे यास रंगेहात पकडले.सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबादचे पोलीस उपाधीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow