पिकअप आणि कारचा भीषण अपघात
बीड प्रतिनिधी :- बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे बस स्थानकासमोर कार आणि पिकप चा भीषण अपघात आज शनिवार दिनांक 27 जानेवारी रोजी दुपारी झाला. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील लिंबागणेश बसस्थानक येथे पिकअप वाहन क्रमांक एम एच २३ ए यु ७०७० आणि नेक्सन कार क्रमांक एम एच १२ यु एफ.४८९५ यांचा लिंबागणेश बस स्थानकासमोर महामार्गावर भिषण अपघात झाला. परळी ते पुणे भाजीपाला वाहतूक करणारे पिक होते तर समोरून नगर कडून केज कडे जाणारी कार होती. या दोन्ही वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नेकनूर पोलीस दाखल झाले यामध्ये पिकअप पलटी झाला असून कारचेही समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
What's Your Reaction?