दोन कारचा समोरासमोर भीषण अपघात, गाड्या पलटी मोठे नुकसान

बीड प्रतिनिधी:- कोरेगाव फाटा येथे दोन कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला असून यामध्ये जखमींना तात्काळ बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी घटनास्थळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी जखमींना मदत केली.
आज बुधवार दिनांक 27 मार्च रोजी सायंकाळी बीड केज महामार्गावर कोरेगाव फाटा येथे एक स्कॉर्पिओ गाडी आणि दुसरी रेनॉल्ट डस्टर या दोन्ही गाड्यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की 15 फूट खोल नाल्यामध्ये गाड्या जाऊन पडल्या. यामध्ये दोघेजण गंभीरित्या जखमी झाले आहेत.त्यावेळी रेनॉल डस्टर गाडीमध्ये बीड तालुक्यातील बहिरवाडी येथील हरिराम सूर्यभान बोबडे व त्यांचा मुलगा पवन हरीराम बोबडे जखमी झाले. यामध्ये दोन्ही वाहनांचे पलटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे यावेळी तात्काळ भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ जखमींना त्यांना बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पोहोचवले. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
What's Your Reaction?






