परळीत रेल्वेस्टेशनवर रेल्वे खाली चिरडून तरुणाचा मृत्यू

परळीत रेल्वेस्टेशनवर रेल्वे खाली चिरडून तरुणाचा मृत्यू

परळी वैजनाथ प्रतिनिधी:-  परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर रेल्वे खाली चिरडून, एका कामगार तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सोमवारी घडली आहे. घटनास्थळी पोलिसांनी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला.

बीड जिल्ह्यातील परळी रेल्वे स्थानकावर आज सोमवारी ,नांदेड ते बेंगलोर जाणारी लिंक एक्सप्रेस आली असता, त्या ठिकाणी अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या एका तरुणाचा हात निसटल्याने, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आहे. सदर मुलाचे वय अंदाजे 22 वर्ष असल्याचे सांगण्यात आले. हा मुलगा उत्तर प्रदेश येथील रहिवाशी होता. सदर मुलगा व्यवसायासाठी परळी रेल्वे स्थानक येथे कामाला होता. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वे पोलीस दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा केला. मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालय येथे उत्तरिय तपासणीसाठी पाठवण्यात आला. याचा पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow