सहा हजाराच्या लाच प्रकरणात तलाठ्यावर एसीबीची कारवाई
बीड प्रतिनिधी: रांजणी येथील सज्जाच्या तलाठ्याने, वारस हक्का नुसार सातबाराला नोंद घेण्यासाठी ,सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी संबंधित तलाठ्यावर बीडच्या एसीबीने कारवाई केली असून, गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई आज बुधवारी केली आहे.
गेवराई तालुक्यात तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेली, गट नंबर 35/03 संगम जळगाव येथे असलेल्या, शेत जमिनीत सातबारावर तक्रारदार व त्याचे भाऊ बहीण आई यांची नावे वारस हक्काद्वारे, नोंद घ्यायची होती. त्यासाठी तलाठी सानप राजाभाऊ बाबुराव राहणार बीड याने, पंचा समक्ष दि.21 एप्रिल रोजी 6000 रुपये लाचेची मागणी केली होती. म्हणून या प्रकरणी आज बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी बीडच्या एसीबी पथकाने कारवाई केली आहे. तसेच या प्रकरणात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेख, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली आहे.
What's Your Reaction?