निवडणूक बंदोबस्तात गैरहजर, दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर एसपींची कारवाई

बीड प्रतिनिधी:- निवडणूक बंदोबस्तात गैरहजर असणाऱ्या परळी आणि पाटोदा येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यावर पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी कारवाई केली आहे त्यांच्यावर बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणूकीसाठी बीडमधून काही पोलिस वर्धा जिल्ह्यात बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले. परंतू परळी व पाटोदा येथील दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी या बंदोबस्ताकडे दुर्लक्ष करत गैरहजेरी लावली. त्यामुळे या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी ही कारवाई केली आहे. संजय दशरथ गांगुर्डे हे पाटोदा पोलिस ठाण्यात तर हरीदास शामराव गिते हे परळीच्या संभाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. या दोघांविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
What's Your Reaction?






