दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तिघांवर गुन्हा दाखल
माजलगाव तालुक्यातील एका गावामध्ये दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्को सह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील एका गावामध्ये दोन अल्पवयीन मुली शेळ्या चारण्यासाठी शेतात दिनांक दहा रोजी गेल्या होत्या त्यानंतर तिघे जण दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करत पाठीमागे आले व त्यातील दोघांनी दोघींना पकडून उसाच्या शेतात नेले आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार केला त्यानंतर दिनांक अकरा रोजी ही त्या एका मुली सोबत असा प्रकार घडला. त्यानंतर एका अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये या तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?