बीड न्यायालयाचे न्यायाधीश आणि त्यांच्या चालकाचा अपघाती मृत्यू

बीड येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश उद्धव पाटील यांच्या ओमिनी गाडी आणि ट्रकचा रेनापुर उदगीर महामार्गावर भीषण अपघात झाला या अपघातात न्यायाधीश व त्यांचा चालक जागी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
उद्भव वसंत पाटील (रा. अजनसोंडा खु., ता.चाकूर) हे बीड येथे दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी ते चालक बळी नंदकुमार टमके (रा. अजनसोंडा खु., ता. चाकूर) यांच्यासोबत ओमनीने (एमएच 17 बीव्ही 1257) गावाकडे निघाले होते. दरम्यान, रेणापूर- उदगीर मार्गावरील आष्टामोडकडे जाताना सेवादासनगर तांडा येथे शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने (एमएच 24 एबी 8401) त्यांच्या वाहनाला जोराची धडक दिली. यामध्ये न्यायाधीश पाटील आणि चालक टमके हे जागीच ठार झाले. मात्र ट्रकचालक न थांबता पसार झाला. घटनास्थळी तांड्यावरील युवक, नागरिकांनी धाव घेतली. ओमनीचा पार चक्काचूर झाल्याने त्या दोघांनाही बाहेर काढण्यासाठी दीड तासाचा अवधी लागला.
What's Your Reaction?






