कोपर्डी प्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या

पुणे प्रतिनिधी :-महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपीने येरवडा कारागृहात आत्महत्या केली आहे. आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील येरवडा कारागृहात आत्महत्या घेत जीवन संपवलं आहे. आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आरोपी जितेंद्र शिंदे याने स्वत:च्या कपड्यानी गळफास लावून घेतल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकारी पोहचले आहे. आरोपीचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला असून तिथे त्याचं शवविच्छेदन करण्यात येईल. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
कोपर्डीतील हत्या प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे येरवडा कारागृहात होता. कारागृहातील सुरक्षा क्रमांक 1 मधील खोली क्रमांक 14 मध्ये पप्पूने टॉवेल फाडून कापडी पट्टीच्या साहाय्याने खोलीच्या दरवाजावरील पट्टीला बांधून सकाळी सहाच्या सुमारास आत्महत्या केली. ही बाब कामावर असणाऱ्या करागृह कर्मचारी निलेश कांबळे यांच्या लक्षात आली त्यांनी तातडीने उतर सहकाऱ्यांना बोलावून घेत पप्पूला खाली उतरवले परंतु तोपर्यंत त्याचा जीव गेला होता. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पप्पूवर मानसिक आजारावर कारागृह मनोरुग्ण तज्ज्ञ यांच्या सल्ल्याने नियमीत औषधपचार सुरू होते.
What's Your Reaction?






