शासकीय कामात अडथळा केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
शासकीय कामकाजामध्ये अडथळा केल्याच्या आरोपातून गणेश जाधव याची निर्दोष मुक्तता जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांनी केली आहे.
बीड बस स्थानकात बस मागे घेताना थांबवली नाही म्हणून वाहकास गणेश जाधव यांनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा केला असा गुन्हा फिर्यादीने पोलीस स्टेशन शिवाजी नगर बीड येथे फिर्यादी ने दाखल केले वरून मा.जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे दोषारोप पत्र दाखल केले त्यास सेषन केस नंबर 29/2020 अन्वये नोंद करण्यात येऊन सदर प्रकरणात सरकार पक्षाचे वतीने एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले होते.परंतु आरोपीचे वकिलांनी घेतलेला सक्षम बचाव मा.जिल्हा व सत्र न्यायालय मा.के.आर.जोगळेकर साहेब यांनी ग्राह्य धरून आरोपीस निर्दोष मुक्त केले. आरोपीचे वतीने ऍड.राजेश जाधव यांनी कामकाज पाहिले त्याना ऍड.विवेक डोके,ऍड.सतीश गाडे,ऍड.सागर नाईकवाडे,ऍड.सुधीर जाधव,ऍड.रूचके ऍड.जोगदंड यांनी सहकार्य केले
What's Your Reaction?