घोसापुरी शिवारात 85 ब्रास अवैध वाळू साठ्यावर कारवाई

घोसापुरी शिवारात 85 ब्रास अवैध वाळू साठ्यावर कारवाई
तहसीलदार हजारे व त्यांची टीम कारवाई करताना..

बीड प्रतिनिधी-  बीड तालुक्यातील घोसापुरी शिवारामध्ये, 85 ब्रास वाळू साठा जप्त केल्याची घटना घडली असून, बीडचे तहसीलदार सुहास हजारे व त्यांच्या टीमने ही कारवाई केली आहे.

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाजवळ, नामलगाव फाटा परिसरातील घोसापुरी शिवारात वाळू माफियांनी, अवैध वाळू साठा करून ठेवला होता. याचीच माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर, तात्काळ बीडचे अप्पर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी आणि कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, बीड तहसीलचे तहसीलदार सुहास हजारे, मंडळ अधिकारी जितेंद्र वाघ, तलाठी विकास कोरडे, आदी अधिकारी, अधिकाऱ्यांनी सदर वाळू साठ्याच्या ठिकाणी जाऊन छापा टाकला. त्या ठिकाणी सुमारे 15 हायवा एवढी वाळू पथकाच्या निदर्शनास आली. सदर वाळूवर प्रशासनाने कारवाई करून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आणण्यात आली. प्रशासनाने केलेल्या सदर कारवाईमुळे वाळू माफियाचे धाबे दणाणले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow