महसूल पथकाची वाळू वाहतूक हायवावर कारवाई
बेकायदेशीरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या हायवावर गेवराई येथील महसूल पथकाने संगम जळगाव येथे कारवाई केली असून ऐवज जप्त केला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरूच आहे. प्रशासनाकडून अनेक कारवाया होत आहेत, तरी चोरटी वाहतूक अद्याप सुरूच आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या एका हायवावर संगम जळगाव येथील नागरी वस्तीवर कारवाई केली आहे.
महसूलच्या पथकाने अवैध वाळू सह हायवा ताब्यात घेतला आहे. सदर कारवाई तहसीलदार संदीप खोमणे, जितेंद्र लेंडाळ, पखाले, मंडळ अधिकारी किरण दांडगे, निखिल तपसे, अक्षय डोके, माणिक पांढरे, शुभम गायकवाड, विठ्ठल सुतार, गजानन शिंगणे, कुंदन काळे आदींनी केली आहे.
What's Your Reaction?