अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई, सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त
बीड प्रतिनिधी :- धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड गेवराई दरम्यान एका पेट्रोल पंपाजवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवावर, पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे एक कोटी 20 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कारवाई आज शनिवारी पहाटेच्या दरम्यान केले आहे.
बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा करून वाळू वाहतूक करत असल्याची माहिती, गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर यांना मिळाली होती. यावेळी बांगर यांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करून घेऊन जाताना तीन हायवा पाठलाग करून ताब्यात घेतले. सदर कारवाई आज शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान केली होती. त्यांच्याकडून एक कोटी 20 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली, गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर, सपोनि संतोष जंजाळ, पोलीस उपनिरीक्षक अशोक शेळके पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर व कर्मचाऱ्यांनी केली आहे.
What's Your Reaction?